कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी लस घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:35 IST2021-08-17T04:35:24+5:302021-08-17T04:35:24+5:30
जालना : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना ...

कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी लस घ्यावी
जालना : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस वेळेत घ्यावी. लसीकरणानंतरही प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रविवारी आयोजित स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शर्मिला भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, प्रशांत पडघन आदींची उपस्थिती होती.
यावेळी टोपे यांनी कोरोनातील उपाययोजनांसह इतर विविध कामांचा आढावा घेतला. जिल्हा कारागृह आस्थापनेवरील हवालदार सिद्धार्थ वाघमारे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आला. तसेच वीरपत्नी उज्ज्वला चंद्रकला सुळे, वीरपिता महादेव विठ्ठल सुळे, वीरपत्नी लीलाबाई यांचाही सन्मान करण्यात आला. कोरोनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉ. अन्वय देशपांडे, ज्ञानेश्वर आढाव, स्वाती पाटोळे, मोना रजाक, डॉ. संतोष कडले, डॉ. गजानन म्हस्के, राजू रसाळ, महेंद्र वाघमारे, अश्विनी पुणेवाड, अमोल चिचोडकर, डॉ. परशुराम नागदरवाड, संदीप घुगे यांचाही प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान, जिल्हाभरात रविवारी स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
चौकट
कोरोनायोद्ध्यांचा सत्कार
जालना : कोरोनाकाळात उत्कृष्ट काम करणारे कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगार, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर अशा ४५० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कोरोनायोद्ध्यांनी केलेले काम अभिमानास्पद असल्याचे मत आ. गोरंट्याल यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, लायन्सचे उपप्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया, अतुल लड्डा, अध्यक्षा मीनाक्षी दाड, सचिव जयश्री लड्डा, कोषाध्यक्ष प्रेमलता लोया, विजयकुमार दाड, प्रकल्पप्रमुख डॉ. गिरीश पाकणीकर, प्रमोद रुणवाल, संगीता रुणवाल, जगत घुगे, डॉ. संगीता देशमुख, प्रकाश कुंडलकर, अरुण मित्तल, मोहन राठोड, मीरा राठोड, द्वारकादास मुंदडा, दिनेश लोहिया आदींची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, पुरुषोत्तम जयपुरिया, मीनाक्षी दाड यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी तांदूळवाडी गावातील युवराज राठोड, मोहन राठोड, मीरा राठोड यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगत घुगे यांनी, तर आभार क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी दाड यांनी मानले.