अखेर दोन्ही पुलावरील खड्ड्यांच्या डागडूजीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:06+5:302021-02-25T04:38:06+5:30

लोकमत दणका- त्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग केदारखेडा- येथील जालना-भोकरदन रस्त्यावरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एकास शनिवारी ...

Eventually the repair of the pits on both bridges began | अखेर दोन्ही पुलावरील खड्ड्यांच्या डागडूजीला सुरुवात

अखेर दोन्ही पुलावरील खड्ड्यांच्या डागडूजीला सुरुवात

लोकमत दणका- त्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग

केदारखेडा- येथील जालना-भोकरदन रस्त्यावरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एकास शनिवारी जीव गमवावा लागला होता. याबाबत लोकमतने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीबाबत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.

जालना- भोकरदन रस्त्यावरील पुलावर शनिवारी खड्डे चुकविण्याच्या नादात आणि दिशादर्शक फलक नसल्याने सळईने भरलेला ट्रक थेट पुलाखाली गेला होता. त्यात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. या खड्ड्यांमुळे या अगोदरही अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सोमवारी लोकमतने खड्यांमुळे ट्रक पुलाखाली, एक ठार तर दोन जखमी या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारीच साहित्य आणून मंगळवारी या खड्यांच्या डागडुजीला सुरुवात केली आहे.

चौकट

पुलावर दिशादर्शक फलकांची उभारणीसुद्धा लवकरच करण्यात येईल. येथील दोन्ही पुलावर कामाच्या वेळीच दिशादर्शक फलक लावण्यात आले होते; परंतु ते फलक कोणीतरी चोरून नेले होते, याची माहिती वरिष्ठांना सांगण्यात आली आहे.

डी. एन. कोल्हे, उपअभियंता उपविभाग, सा.बां. भोकरदन.

Web Title: Eventually the repair of the pits on both bridges began

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.