जाफराबादेत ठिकठिकाणी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST2021-02-05T08:05:44+5:302021-02-05T08:05:44+5:30
तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार केशव डकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित ...

जाफराबादेत ठिकठिकाणी कार्यक्रम
तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार केशव डकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे, गटविकास अधिकारी बोडखे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अशोक काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सुनील मेढे, प्रा. विनोद हिवराळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
जिजाऊ महाविद्यालयात, वरुड बु.
वरुड बुद्रुक : येथील जिजाऊ कला व विज्ञान महाविद्यालयात सुयश लहाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विलास शिंदे, सुनील सातव, भागवत करडेल, प्राचार्य प्रा. पवार, प्राचार्य प्रा. भालके, प्रा. सिद्धेश्वर लोखंडे, लांडगे, गाडेकर, चव्हाण, भाग्यश्री देशमुख यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
..........
गुरुदेव विद्यालय, जानेफळ पंडित
जानेफळ पंडित : येथील श्री गुरुदेव उच्च माध्यमिक विद्यालयात संस्था सचिव पी.एस. मुरकुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक जी.एन. सिनगारे, आर.आर. पंडित, प्रा. के.जी. पंडित, प्रा.जीवन मुरकुटे आदींची उपस्थिती होती.