आशा डे निमित्त बदनापुरात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:31 IST2021-01-03T04:31:02+5:302021-01-03T04:31:02+5:30
बदनापूर : आशा- डे निमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरातील पंचायत समिती कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले ...

आशा डे निमित्त बदनापुरात कार्यक्रम
बदनापूर : आशा- डे निमित्त तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने शहरातील पंचायत समिती कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. प्रथम आरोग्य देवता धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी डॉ. योगेश सोळंके यांनी आशा यांनी कोरोना मध्ये व माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले.
यापुढे गावपातळीवर आशा यांना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान, आरोग्य विषयक, प्रश्न मंजुषा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. मागील वर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाºया प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीन आशा यांचा सत्कार करून प्रशस्तीपत्र पत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके, गटविकास अधिकारी व्ही. आर. हरकळ, वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन कुंडकर, तालुका आरोग्य पर्यवेक्षक सुदेश वाठोरे, तालुका समुह संघटक सीमा देवरे यांची उपस्थिती होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश सोळंके यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी रवि खरात, प्रदीप पिसे, ज्योती चव्हाण यांनी प्रयत्न केले.