रेशनच्या साखरेचे नियतन जिल्ह्यात तीन महिन्यांपासून बंद

By Admin | Updated: May 12, 2014 00:05 IST2014-05-11T23:32:37+5:302014-05-12T00:05:13+5:30

जालना: जिल्ह्यातील सार्वत्रिक वितरण प्रणालीतील साखर मागील तीन महिन्यांपासून वितरित करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Establishment of Ration Sugar has been closed for three months in the district | रेशनच्या साखरेचे नियतन जिल्ह्यात तीन महिन्यांपासून बंद

रेशनच्या साखरेचे नियतन जिल्ह्यात तीन महिन्यांपासून बंद

 जालना: जिल्ह्यातील सार्वत्रिक वितरण प्रणालीतील साखर मागील तीन महिन्यांपासून वितरित करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे साखर रेशन दुकानातून गायब झाली असून फक्त गहू व तांदळाचेच वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात १२८५ रेशन दुकान असून ३ लाख ३० हजार ३३ रेशनकार्ड धारक आहे. कार्ड धारकांना विविध योजनेतंर्गत गहू, तांदूळ, साखर, पामतेल व डाळीचे वितरण केले जाते. जालना जिल्ह्यात मात्र फक्त गहु व तादंळाचेच वितरण केले जात आहे. साखर, पामतेल, डाळीचे वाटप होताना दिसत नाही. बाजारात साखरेच्या भावात मोठी तेजी निर्माण झाली आहे. सध्या बाजारात ३५ ते ३७ रूपये किलो प्रमाणे साखरेचे भाव आहे. त्या उलट रेशन दुकानावर साखरेचे भाव १३ रूपये ५० पैसे किलो आहे.त्यामुळे रेशनच्या साखरेची मागणी वाढली आहे. कार्डधारक दुकानात साखर केव्हा येणार याची वाट पाहत आहे. मागील तीन महिन्यापासून जिल्ह्यात रेशनची साखर वाटप न झाल्याने कार्डधारकांत नाराजी आहे. विशेषत: ग्रामीण भागात बीपीएल ९ अंत्योदय योेजनेचे लाभार्थी साखरेच्या प्रतीक्षेत आहे. (प्रतिनिधी) नियतन बंद जिल्ह्यात ३ हजार ६०९ टन साखरेचे महिन्याला नियतन होत होते. मागील तीन महिन्यापासून शासकीय स्तरावरच साखरेचे नियतन बंद झाले. त्यामुळे साखरेचे वाटप होत नाही. तसेच पामतेल सणासुदीच्या काळात उपलब्ध करण्यात येतात. त्यामुळे सध्या फक्त गहु व तादंळाचे वाटप होत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी माचेवाड यांनी दिली. ग्रामीण भागात बीपीएल, अंत्योदय योजनेचे शिधापत्रिकाधारक साखरेच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज ते रेशन दुकानांवर चौकशी करताना दिसतात.

Web Title: Establishment of Ration Sugar has been closed for three months in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.