शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अ‍ॅडविक क्लबच्या पुढाकारातून पूरग्रस्तांना भरभरून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 01:04 IST

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जालना शहरातील अ‍ॅडविक क्लबच्या युवकांनी पुढाकार घेत सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीने तीन टेम्पो साहित्याचे संकलन केले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : कोल्हापूर, सांगली परिसरात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जालना शहरातील अ‍ॅडविक क्लबच्या युवकांनी पुढाकार घेत सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीने तीन टेम्पो साहित्याचे संकलन केले आहे. हे तीन टेम्पो सांगलीकडे रवाना झाल्याचे क्लबचे अध्यक्ष राहुल अग्रवाल यांनी सांगितले.जालना शहरातील अ‍ॅडविक क्लबचे युवक सतत सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतात. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील नद्यांना पूर आला आणि शहरांसह अनेक गावे पाण्याखाली गेली. यात लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कोल्हापूर, सांगली भागातील भीषण परिस्थिती पाहून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय अ‍ॅडविक क्लबच्या सदस्यांनी घेतला. अध्यक्ष राहूल किशोर अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्यातून दैनंदिन साहित्य, अन्नधान्य, पाण्याच्या बॉटल, कपडे, औषधी आदी विविध साहित्याचे संकलन केले. विशेषत: तीन टेम्पो भरून साहित्य जमा करण्यात आले आहे. हे साहित्य सांगलीकडे रवाना झाल्याचे राहूल अग्रवाल, पियुश शहा यांनी सांगितले.युवक करणार स्वत: वाटपतीन टेम्पो भरलेले साहित्य घेऊन क्लबचे सदस्य सांगलीकडे रवाना झाले. तेथील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ही मदत गरजुंना दिली जाणार आहे. मदत पाठविण्याऐवजी आपण स्वत: गरजू पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवावी, या भावनेतून आम्ही सांगलीकडे जात असल्याचे राहुल अग्रवाल म्हणाले.अ‍ॅडविक क्लबने पुढाकार घेत शुद्ध पाण्याच्या बॉटलचे ४५० बॉक्स, बिस्कीट पुड्याचे १०० कार्टून, ५०० किलो चिवडा, १ हजार किलो गव्हाचे पीठ, ४०० किलो तांदूळ, तीन हजार सॅनेटरी नॅपकीन, १५०० ब्लँकेट, २ टन डाळी व धान्यासह औषधी, कपडे, साबण आदी साहित्य भरून तीन टेम्पो सांगली जिल्ह्यातील औदुंबर गावाकडे रवाना झाले.या मदत साहित्यासोबत क्लबचे अध्यक्ष राहुल अग्रवाल, पीयूष शहा, केदार जाधव, सिध्दांत तवरावाला, शिवम लाहोटी, प्रणय बागडी, सौरभ दायमा, रोषण रूणवाल, कुशल गिल्डा हेही रवाना झाले.

टॅग्स :Socialसामाजिकfloodपूरkolhapurकोल्हापूरSangliसांगली