प्रवेश प्रक्रियेअभावी अभियांत्रिकी महाविद्यालये बंद; अर्थचक्र बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:22+5:302021-01-19T04:32:22+5:30
जालना : येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. परिणामी प्रवेश प्रक्रियाच न झाल्याने शासनाकडून मिळणारे देय ही वेळेवर ...

प्रवेश प्रक्रियेअभावी अभियांत्रिकी महाविद्यालये बंद; अर्थचक्र बिघडले
जालना : येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. परिणामी प्रवेश प्रक्रियाच न झाल्याने शासनाकडून मिळणारे देय ही वेळेवर मिळालेले नाही. त्यामुळे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासह प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम ज्या प्रमाणे इतर संस्था, आस्थापनांवर झाला, तसाच परिणाम अभियांत्रिकी महाविद्यालयांवरही झाला आहे. ऑगस्ट अखेर संपणारी अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया आता फेब्रुवारी अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया रखडल्याने जिल्ह्यातीलच नव्हे, तर मराठवाड्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे आर्थिक गणित बिघडले आहे. विशेषत: खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांना अधिक फटका बसत असून, याची झळ प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. त्यामुळे शासनाने या बाबीकडे विशेष लक्ष देऊन या महाविद्यालयांना विशेष अनुदान देण्याची गरज आहे.
मॅनेजमेंटचा कर्मचाऱ्यांना आधार
प्रवेश प्रक्रिया लांबल्याने महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न काही वेळा निर्माण होतो. त्यामुळे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक प्रश्न उभे राहतात. परंतु, महाविद्यालयातील मॅनेजमेंटच्या सहकार्यामुळे या प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत असून, त्यांनाही या काळात आधार मिळत आहे.
प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न
अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया कोरोनामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत चालणार आहे. प्रवेश प्रक्रिया न झाल्याने शासनाकडून येणारे देय मिळाले नसल्याने काहीसे आर्थिक प्रश्न आहेत. परंतु, मॅनेजमेंटच्या सहकार्यामुळे आर्थिकसह इतर सर्व प्रश्न मार्गी लागत आहेत.
- एस. के. बिरादार, प्राचार्य मत्स्योदरी अभियांत्रिकी विद्यालय, जालना
शासकीय
००
खासगी
०१
प्राध्यापकांची संख्या
६८
शिक्षकेतर कर्मचारी संख्या
४२