शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

शेतकऱ्यांची चिंता संपता संपेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:42 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्देप्रेरणा प्रकल्पाचे सर्वेक्षण : समुपदेशातून आणले मृत्यूच्या दारातून परत

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विदर्भ व मराठावाडा विभागाच्या १४ जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासंर्दभात प्रेरणा प्रकल्प सुरु केला. याची माहिती देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर सोपविलेली आहे. शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांतर्गत नोव्हेंबर २०१५ पासून हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कासवगतीने सुरु झालेल्या कार्यक्रमात सद्य: स्थितीत उत्कृष्ट सेवा बजावणे सुरु केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपाली मुळे, नितीन पवार, मनोविकृती तज्ञ डॉ. सदीप लहाने, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ महेंद्र बोबडे, स्वाती जाधव हे या प्रकल्पांतर्गत शेतकºयांना समुपदेशन करुन आत्महत्येपासून थांबविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या उपक्रमाचे फलित झाल्याचे दिसत आहे.नऊ महिन्यात ६२ शेतकºयांच्या आत्महत्याजिल्ह्याभरात मागील ९ महिन्यांमध्ये ६२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. यात जुन महिन्यात सर्वाधिक १३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. शेतकºयांनी नैराश्य, तणाव, बिकट आर्थिक परिस्थिती अर्थिक परिस्थिती, नापिकी यासारख्या विविध कारणांमुळे जीवन संपविल्याचे समोर आले आहे.अशी करतात जनजागृतीशेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दरवर्षी जागतिक आत्महत्या दिनी सप्ताह राबविण्यात येतो. आशा मार्फत जनजागृती करण्यात येते. विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन शेतकºयांना याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुंटुबांना भेटी दिल्या जातात.अशी होते तपासणीआशा स्वयंसेविका शेतकºयाच्या घरी जाऊन सर्वेक्षण करतात. जे शेतकरी तणावग्रस्त आहेत. अशांना टोल फ्री क्रमाकांवर समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील शेतकºयाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मन परिवर्तन केले जाते.प्रत्येक सहा महिन्याला होते सर्वेक्षणप्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक सहा महिन्याला हे सर्वेक्षण होते. जुलैपर्यत झालेल्या सर्वेक्षणात ३ लाख २९ हजार कुंटुबियांना भेटी दिल्या. यामध्ये सौम्य -२३८, मध्यम- ६२, तर तीव्र ६ शेतकरी तणाव खाली असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र