साठे व्याख्यानमालेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 01:01 AM2019-07-31T01:01:32+5:302019-07-31T01:04:40+5:30

तीन दिवसीय आयोजित अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचा समारोप सोमवारी गायिका पंचशीला भालेराव (औरंगाबाद) यांच्या जलसा या कार्यक्रमाने करण्यात आला.

End of Stocks Lecture | साठे व्याख्यानमालेचा समारोप

साठे व्याख्यानमालेचा समारोप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तीन दिवसीय आयोजित अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचा समारोप सोमवारी गायिका पंचशीला भालेराव (औरंगाबाद) यांच्या जलसा या कार्यक्रमाने करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दामिनी पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक पल्लवी जाधव यांनी केले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून समाजसेवक एम. पी. पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी गायिका पंचशीला भालेराव, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रशांत नवगिरे, नगरसेवक विनोद रत्नपारखे, नगरसेवक अमीर पाशा, अखिल भारतीय सेनेचे गणेश चांदोडे, औरंगाबादचे नगरसेवक राजू अहिरे, इचलकरंजी बँकेचे शाखा व्यवस्थापक पोहोळ, जीवन खंडागळे, योगेश रत्नपारखे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी विविध क्षेत्रांत मातंग समाजाचे नाव उंचावल्या बद्दल अभिनेत्री पुष्पा पिसुळे, मिस इंडिया २ प्रतीक्षा नवगिरे, डॉ. अंजली डोईफोडे, अ‍ॅड. पौर्णिमा जाधव यांचा शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी सचिव बंडूभाऊ डोईफोडे, उपाध्यक्ष मनोज बीडकर, मुकेश कुचेकर, कोषाध्यक्ष सचिन निकाळजे, सहसचिव संतोष तुपसौंदर, प्रकाश लोंढे, मुख्य संयोजक शिवराज जाधव, सी. के. डोईफोडे, गणेश भालेराव, प्रा. डॉ. विजय कुमठेकर, शांतीलाल लोंढे, हंसराज मोरे, रवींद्र म्हस्के, करूणा नामवाड आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत म्हणाले की, अण्णा भाऊ साठे व्याख्यानमालेचा उपक्रम स्तुत्य आहे. या व्याख्यानमालेतून विचारांचे आदान प्रदान होणे गरजेचे आहे.
यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी सांगितले की, अण्णा भाऊ साठे यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जालन्यात व्याख्यानमालेची परंपरा सुरू करण्यात आली आहे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी जालन्यातील सर्व समाजबांधव आम्हाला मदत करतात ही एक समाधानाची बाब आहे. आगामी काळातही आम्ही अण्णा भाऊ साठेंचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी शालेय पातळीवर निबंध स्पर्धा तसेच वाद-विवाद स्पर्धा घेणार असल्याचे नवगिरे यांनी समारोपप्रसंगी सांगितले.
गाण्यावर घेतला श्रोत्यांनी ठेका
यावेळी गायिका पंचशीला भालेराव यांचा शाहिरी जलसा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यांनी त्यांच्या गाण्यावर श्रोत्यांना ठेका धरावयास लावला. याप्रसंगी अभिनेत्री पुष्पा पिसुळे यांनी नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज मोरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष नगरसेवक विजय कांबळे यांनी मानले.

Web Title: End of Stocks Lecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.