निवडणुकीनंतर उमेदवारांचा आरामासह आढाव्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:52 AM2019-10-23T00:52:33+5:302019-10-23T00:52:58+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला.

Emphasize review of candidates after election | निवडणुकीनंतर उमेदवारांचा आरामासह आढाव्यावर भर

निवडणुकीनंतर उमेदवारांचा आरामासह आढाव्यावर भर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला. मतदाना नंतरचा दुसरा दिवस अर्थात मंगळवारी जवळपास सर्व नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरामाला प्राधान्य दिले. एरवी सकाळी सातच्या आत बाहेर पडणाऱ्या नेत्यांच्या गाड्या तसेच त्यांच्या बंगल्यासमोर जमणारी गर्दी आज दिसून आली नाही. अनेक नेत्यांचा दिवस हा दुपारी एक वाजेनंतरच सुरू झाला. दिवसभर अत्यंत आरामदायी पध्दतीने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. यासाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासूनच नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू होती.
मंगळवारी जालन्यातील शिवसेनचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आराम करण्याचा सल्ला देऊन स्वत: देखील १२ वाजेनंतर बाहेर पडणे पसंद केले. दुपारनंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्र तसेच नातेवाईकांकडे जाऊन एकूण परिस्थितीवर चर्चा केली. आलेल्या कार्यर्त्यांकडून कुठे कसे मतदान झाले याचा आढावा घेतला. काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी हाच कित्ता गिरवला.
घनसावंगी मतदारसंघातील उमेदवार राजेश टोपे यांनीही सकाळी पाथरवाला येथील निवासस्थानी थांबून घरी आलेल्या पदाधिकारी, कार्यत्यााच्या भेटी घेतल्या. तसेच सायंकाळी मुंबईला आईला भेटण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. निवडणूकीच्या धामधूमित आई आजारी असतांनाही भेटीला जाता आले नसल्याची खंत आ. राजेश टोपे यांनी बोलून दाखवली.
भोकरदन विधानसभेचे भाजपचे उमेदवार संतोष दानवे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी दुपारनंतर घरी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला. त्यांचाही दिवस उशिराच सुरू झाला. बदनापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. नारायण कुचे यांनी देखील बदनापूर तसेच अंबडसह अनेक गावात भेटी दिल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बबलू चौधरी यांनी जालन्यातून सकाळी उशिरा बदनापूरला जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. परतूर मतदार संघात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुपारनंतर कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आढावा घेतला. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेशकुमार जेथलिया हे दिवसभर परतूरमध्येच होते. त्यांनीही कार्यर्त्यांच्या भेटी घेतल्या.
मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे, आता गुरूवारीच काय ते चित्र स्पष्ट होणार असले तरी अनेक तर्कवितर्क लावले जात असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत टोपे विरूध्द सर्व असे समीकरण या मतदारसंघात दिसून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हिकमत उढाण हे मंगळवारी घनसावंगीतच होते.
नेहमीपेक्षा त्यांचा दिवस थोडा उशिराने सुरू झाला होता. त्यांनी आंतरवाली टेंभी, उकडगाव, रांजणी तसेच जालन्यातील जिल्हा सरकारी रूग्णालयास भेट दिली. या रूग्णालयात एका जखमी कार्यकर्त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.

Web Title: Emphasize review of candidates after election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.