वैयक्तिक गाठीभेटींवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:49 AM2019-08-03T00:49:05+5:302019-08-03T00:49:29+5:30

जालना - औरंगाबाद स्थानिक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीने आता रंगत वाढवली आहे.

Emphasis on personal bouts | वैयक्तिक गाठीभेटींवर भर

वैयक्तिक गाठीभेटींवर भर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना - औरंगाबाद स्थानिक मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीने आता रंगत वाढवली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अंबडचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेचे निष्ठावान ज्येष्ठ नेते बाबूराव कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे. तर युतीकडून औरंगाबाद येथील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवेंना रिंगणात उतरवले आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पातळीवर प्रचारास प्रारंभ केला असून, वैय्यक्तीक भेटींवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.
जालना - औरंगाबाद विधानपरिषदेत सध्या काँग्रेसचे विद्यमान आ. सुभाष झांबड हे आहेत. त्यमुळे काँग्रेसला यंदाही यश मिळेल काय या दिशेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा कस लागणार आहे. गेल्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी मागे घ्यावी लागल्याने कुलकर्णी नाराज होते. यंदा त्यांची नाराजी काँग्रेसने दूर केली आहे. कुलकर्णी यांना मोठा राजकीय वारसा असून, त्यांचे वडिल अंबडचे आमदार होते. तसेच अंबड पािलकेत काँग्रेसच्या माध्यमातून बहुतांश काळ हा कुलकर्णी परिवाराचा वरचष्मा होता. आजही बाबूराव कुलकर्णी यांचा मुलगा अंबड पालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
दरम्यान अंबादास दानवे हे कुलकर्णी यांच्यापेक्षा वयाने तरूण आहेत. तसेच या निवडणूकीत मतदारांचा विचार करता, युतीचे पारडे जड आहे. दानवे हे पूर्वी भाजपमध्ये होते. त्यांनी भाजपयुमोच्या माध्यमातून जालन्यातही तेवढाच संपर्क ठेवला होता. त्यातच युतीकडून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दिग्गज प्रचारात असल्याने काँग्रेस आणि युतीत चुरस निर्माण झाली आहे. कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी जालन्यात येऊन काँग्रेस नेत्यांच्या तसेच नगरसेवकांच्या भेटी घेतल्या. तसेच दानवे यांनीही एकदा जालन्याचा दौरा केला होता.त्यावेळी त्यांच्या समवेत माजी . खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, शहराध्यक्ष विष्णू पाचफुले आदींची उपस्थिी होती.

Web Title: Emphasis on personal bouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.