शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचा एल्गार; गावबंदीचे फलक हटवा, दादागिरी चालू देणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 07:03 IST

महाराष्ट्र तुमच्या सातबारावर लिहिला का? आम्हाला आरक्षण घटनेने दिले : भुजबळ

- विजय मुंडे/ अशोक डोरलेअंबड (जि. जालना) : आज मराठा समाजाचा नेता निर्माण झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धनगर, माळी, तेली हे मध्येच घुसले. त्यांना अभ्यास कळत नाही. आम्हाला आरक्षण घटनेने दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. मंडल आयोगाने दिले. नऊ न्यायमूर्तींनी त्यावर शिक्का मारला. आम्ही हक्काचे खातो, सासरच्या घरी तुकडे मोडत नाही, असे टीकास्त्र मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता सोडले. 

दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला? महाराष्ट्र तुमच्या सातबारावर लिहिला का? असा सवाल करीत दादागिरी चालू देणार नाही, गावबंदीचे फलक शासनाने हटवावेत, अशी मागणीही भुजबळांनी केली. अंबड (जि. जालना) येथे शुक्रवारी दुपारी आयोजित ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या ओबीसी समाजबांधवांना ते संबाेधित करत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, नारायण मुंडे, बबनराव तायवाडे, आ. राजेश राठोड, देवयानी फरांदे व इतर ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही भुजबळांनी दिला.  

१०० एकर मैदान तुडुंबअंबड येथील १०० एकर मैदान गर्दीने तुडुंब भरले होते. रस्त्यावरही गर्दी होती. शहराच्या विविध भागांताल पार्किंग परिसर अपुरे पडल्याने वाहने रस्त्यांवर लावण्यात आली होती.

कोड नंबर देऊन हल्लेबीडमध्ये झालेले हल्ले कोड नंबर देऊन झाले होते. अनेक ग्रुप होते. पेट्रोल बॉम्ब तयार होते. चॉपर तयार होते. ४००-४०० जणांच्या जमावाने हल्ला केला, असे भुजबळ म्हणाले. 

ओबीसींच्या हक्काला धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, अशी ही सभा आहे.  ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. महाराष्ट्राचे चित्र बदलण्याची ताकद निर्माण करू.      - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते 

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीसमराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंबंधी घोषणा केली आहे. मात्र, हे करीत असताना ओबीसी समाजावर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकार करणार नाही. सर्व समाजाला विनंती करू इच्छितो की, महाराष्ट्रात कुठलेही समाज एकमेकांसमोर उभे आहेत, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे योग्य नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ओबीसींचा पक्ष काढा : जानकरजोपर्यंत ओबीसींचा स्वत:चा पक्ष होत नाही, तोपर्यंत आपल्या लढ्याला चालना मिळणार नाही. ओबीसींचा पक्ष काढा. दुसऱ्या पक्षाचे आमदार आपल्याकडे येतील, असे महादेव जानकर यावेळी म्हणाले. 

पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीची चर्चाओबीसी एल्गार सभेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण अनेकांनी काढली. त्यांचे छायाचित्र घेऊन अनेकजण या सभेत सहभागी झाले होते. परंतु, या सभेला माजी मंत्री पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. 

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणOBCअन्य मागासवर्गीय जातीJalanaजालना