४० गावांत वीज कपातीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:49 IST2018-03-22T00:49:03+5:302018-03-22T00:49:03+5:30
जाफराबाद तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेले पथदिव्याचा वीज देयकापोटी ५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये थकले आहेत. ग्राम पंचायतचा गाव गाडा पाहणाऱ्या सरपंच,अधिकारी यांनी वेळेत येणारे बिल वेळेत भरणा न केल्या मुळे या गावांना अता अंधाराचा सामना करावा लागत आहे

४० गावांत वीज कपातीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेले पथदिव्याचा वीज देयकापोटी ५ कोटी ६८ लाख ३० हजार रुपये थकले आहेत. ग्राम पंचायतचा गाव गाडा पाहणाऱ्या सरपंच,अधिकारी यांनी वेळेत येणारे बिल वेळेत भरणा न केल्या मुळे या गावांना अता अंधाराचा सामना करावा लागत आहे. १०१ गावा पैकी जवळपास ४० ठिकाणी वीज कपातीची कारवाई येथील महावितरण कार्यालयाने केली आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचे सचिव यांनी थकीत वीज देयका संदर्भात महावितरण कंपनी वसुली करिता भविष्यात ग्राम पंचायत यांच्यावर वीज कपातीची कारवाई करू शकते, तेव्हा आपण आपले थकीत वीज देयके ग्राम पंचायत स्वनिधी, अथवा चौदाव्या वित्त आयोगाच्या मिळालेल्या निधी मधून खर्च करून वीज बिल भरणा करण्यात यावा, अशा सूचना जिल्हा परिषद सीईओ यांना पत्राद्वारे दिल्या
आहेत.
तालुक्यात ग्रामपंचायतींनी मागणी केल्यानुसार सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर पथदिवे ग्राहकांची संख्या ही १८७ आहे.
या सर्वांकडे महावितरणचे सुमारे ५ पाच कोटी ६८ लाख रुपये थकले आहेत.
त्यामुळे मार्च अखेरची वसुली मोहीम हाती घेऊन बिल भरणा न करणा-या ग्राम पंचायतींची वीज खंडित करणे सुरू झाले आहे.