शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वीजप्रश्नी शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 01:06 IST

खंडित वीजपुरवठ्याच्या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या सिपोरा अंभोरा परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी तहसील कार्यालासमोर ठिय्या मांडला

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : खंडित वीजपुरवठ्याच्या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या सिपोरा अंभोरा परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी तहसील कार्यालासमोर ठिय्या मांडला. आंदोलक शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार केशव डकले यांना घेराव घालून विविध प्रश्नांचा भडिमार करीत मागण्यांचे निवेदन दिले.सिपोरा अंभोरा येथील फिडरवर देऊळझरी गावाच्या विजेचा भार जोडावा म्हणून मागील पाच-सहा दिवसांपासून मंगरुळ, डोलखेडा, रुपखेडा येथील शेतक-यांमध्ये वाद सुरु आहे. अगोदरच त्या फिडरवर भार जास्तीचा असल्याने इतर गावांचा भार घेतल्याने कोणत्याच गावांना वीजपुरवठा सुरळीत होणार नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले शेतकरी किशोर अंभोरे व इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.सिपोरा अंभोरा ३३ के.व्ही. सुरु करावे, यासाठी परिसरातील शेतक-यांनी वेळोवेळी लेखी निवेदने, आंदोलने केली आहेत. याचा परिणाम म्हणून ३३ के.व्ही.उपकेंद्र तात्काळ कार्यान्वित करण्यात आले. या विषयी शेतक-यांनी वेळोवेळी अधिका-यांना धारेवर धरले होते. त्याचा राग मनात ठेवून आकसबुध्दीने हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतक-यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, खोटे गुन्हे दाखल करणा-या अधिका-यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसाचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, सुरेश गवळी, दीपक बोराडे, कुंडलिक मुठ्ठे, दिनकर अंभोरे, प्रभाकर अंभोरे, सुनील अंभोरे, अनंत अंभोरे, दाभाडे, दिनकर अंभोरे, दत्ता अंभोरे, ज्ञानेश्वर अंभोरे, ज्ञानेश्वर शिंदे, महादू अंभोरे, संजय अंभोरे, नितीन शिवणकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनTahasildarतहसीलदारmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी