वाहनाच्या धडकेत विद्युत खांब जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST2021-03-08T04:28:37+5:302021-03-08T04:28:37+5:30

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी जाफराबाद : शहरात बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत ...

Electric pole lands in vehicle collision | वाहनाच्या धडकेत विद्युत खांब जमीनदोस्त

वाहनाच्या धडकेत विद्युत खांब जमीनदोस्त

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी

जाफराबाद : शहरात बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत असून, चालकांना कसरत करीत व वाहने चालवावी लागत आहेत. शिवाय मोकाट जनावरांमुळे पादचारी महिला, नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकारी, पदाधिकारी यांनी लक्ष देऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

विस्कळीत सेवेमुळे मोबाइलधारक त्रस्त

अंबड : शहरांतर्गत दूरसंचारची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे एकमेकांशी संपर्क साधणे मुश्कील झाले असून, इंटरनेट सेवेचाही पूर्णत: बोजवारा उडत आहे. विस्कळीत सेवेमुळे शासकीय, निमशासकीय कामांवरही मोठा परिणाम होत आहे. सेवा सुरळीत पुरविण्याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तरी संबंधितांनी लक्ष देऊन सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.

गायकवाड यांचा निवडीबद्दल सत्कार

मंठा : भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या मंठा तालुका प्रसिद्धीप्रमुखपदी तालुक्यातील तळणी येथील बाळासाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रमोद रत्नपारखे, मराठवाडा कार्याध्यक्ष सुधाकर निकाळजे, जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, जिल्हा उपाध्यक्ष सुनील तुरेराव, गौतम सदावर्ते, अचित खरात आदींची उपस्थिती होती.

Web Title: Electric pole lands in vehicle collision