निवडणूक चिन्हांमध्ये आता फुलकोबी, भेंडी, पेनड्राईव्ह, हेडफोनसह १९० चिन्हांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:41 IST2021-01-08T05:41:50+5:302021-01-08T05:41:50+5:30
जालना : ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारांना १९० चिन्हांचा पर्याय समोर आहे. पारंपरिक सह अपारंपरिक चिन्हांचा समावेश ग्रामपंचायत ...

निवडणूक चिन्हांमध्ये आता फुलकोबी, भेंडी, पेनड्राईव्ह, हेडफोनसह १९० चिन्हांचा समावेश
जालना : ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारांना १९० चिन्हांचा पर्याय समोर आहे. पारंपरिक सह अपारंपरिक चिन्हांचा समावेश ग्रामपंचायत निवडणुकीसाठी होत असून, यामध्ये अगदी फुलकोबी, भेंडी, हेडफोन, पेनड्राईव्हचा समावेश आहे.
जालना तालुक्यात ८५ ग्रामपंचायतींसाठी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून जोरात तयारी केली जात आहे. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागामध्ये परिचित असलेल्या वस्तूंचा ग्रामपंचायतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केलेला आहे. आधुनिकतेची कास धरीत संगणक, पेनड्राईव्ह, व्याक्युम क्लिनर आदींचा निवडणूक चिन्हांमध्ये समावेश केलेला आहेत. असे असले तरीही नेहमीची परिचित असणारी वारंवार वापरली जाणाऱ्या मुक्त चिन्हांसाठी उमेदवारांचा आग्रह असल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतेक सर्व फळे व भाज्या, पेनड्राईव्ह, माऊस, व्हेजथाळी, पाव तसेच केक अशा चिन्हांचा ही नव्याने समावेश झाला असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
जालना तालुक्यात ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सोमवारी १९० चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. यंदा फुलकोबी, भेंडी, पेन ड्राईव्ह आदी नव्या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेसार चिन्हांचे वाटप झाले आहे.
-श्रीकांत भुजबळ, तहसीलदार
वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार
कुठल्याच एका पॅनलला एक चिन्ह मिळणार नाही. त्यामुळे पॅनल एक असले तरी वेगवेगळ्या चिन्हांवर लाढावे लागणार आहे. यामुळे पॅनल प्रमुखांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आयोगाने एका पॅनलला एकच चिन्ह देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
पेन ड्राईव्ह, माऊस, फळे, भाज्या, पाव, केक या नवीन चिन्हांची पडली भर
n ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतांश फळे, भाज्या, पाव, केक, क्रेन, पेनड्राईव्ह, माऊस अशा चिन्हांचा नव्याने समावेश झाल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरीही पारंपरिक चिन्हांना अधिक महत्त्व असल्याचे बोलले जात आहे. गेल्या पंचवार्षिकला ग्रामपंचायतीमध्ये वापरल्या गेलेल्या चिन्हांना अधिक पसंती दिल्याचे बहुतांश उमेदवारांनी सांगितले.
n आयोगाने मुक्त चिन्हांची यादी निश्चित केली आहे. एकाच चिन्हांसाठी दोन उमेदवारांनी पसंती दर्शवल्यास नियमानुसार चिन्ह वाटप करण्यात आले, असे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांनी सांगितले.