व्यापाऱ्यास मारहाण करून आठ लाखांची बॅग लंपास
By Admin | Updated: July 22, 2014 00:18 IST2014-07-21T23:44:20+5:302014-07-22T00:18:10+5:30
जालना : व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून तीन चोरट्यांनी त्यांच्याजवळील ८ लाख रुपये असलेली बॅग लंपास केली.

व्यापाऱ्यास मारहाण करून आठ लाखांची बॅग लंपास
जालना : व्यापाऱ्यास बेदम मारहाण करून तीन चोरट्यांनी त्यांच्याजवळील ८ लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. ही घटना शहरातील मंठा रोडवरील महेश भवनजवळ सोमवारी रात्री १०.१५ च्या सुमारास घडली.
प्रीतीसुधागर भागातील रहिवासी कमलेश कौरानी हे व्यापारी सिंधीबाजारमधून मोटारसायकलने रात्री आपल्या घरी जात होते. रस्त्यावरील अंधाराचा फायदा घेऊन तीन चोरट्यांनी कौरानी यांना अडविले व त्यांना बेदम मारहाण केली. चोरटे बॅग घेऊन पसार झाले. या मारहाणीत कौरानी गंभीर जखमी झाले असून त्यांना बेशुद्धावस्थेत उपचारासाठी एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती काही नागरिकांनी रात्री सदर बाजार पोलिसांना दिली.