मानवाधिकार संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:05+5:302021-08-24T04:34:05+5:30
औरंगाबाद येथे नुकतीच संघटनेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. बैठकीचे उद्घाटन शेजवळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य ...

मानवाधिकार संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न
औरंगाबाद येथे नुकतीच संघटनेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. बैठकीचे उद्घाटन शेजवळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अध्यक्ष पांडुरंग नरवडे ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी बंडूजी मडावी, जिल्हा निमंत्रक रवींद्र काकडे, स्वागताध्यक्ष फिरोज खान, रेखा खिल्लारे यांच्यासह अन्य राज्यस्तरीय पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीमध्ये महाराष्ट्रात इंडियन ह्युमन राइट्सचे कार्य विस्तारण्यासाठी अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यासाठी एक अजेंडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार काम केले जाणार आहे. विशेषकरून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. त्याचा मोठा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या एकूणच विकासावर होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू झाल्या पाहिजे. यासाठी आम्ही संघटना प्रयत्न करणार असल्याचे शेजवळ यांनी सांगितले.