दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST2021-02-11T04:32:32+5:302021-02-11T04:32:32+5:30
भोकरदन : दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष उत्तम ...

दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज
भोकरदन : दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी केले. भोकरदन येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात मंगळवारी दिव्यांग बालकांना साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जि.प अध्यक्ष उत्तम वानखडे, पंचायत समिती सभापती वैशाली गावंडे , उपसभापती यशोदा बोडखे, गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, पं.स. सदस्य भगवान रावळकर, अधिव्याख्याता डॉ. सतीश सातव, गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, जिल्हा समन्वयक आर.के.ठाकूर, गटसमन्वयक एस.बी.नेव्हार, शिक्षणप्रेमी सुरेश तळेकर, महेश पुरोहीत, कमलाकर जोगदंडे, ई.पी मगर, एन.एम. दांडगे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्तविक गटशिक्षणाधिकारी डी.एस. शहागडकर यांनी केले. ते म्हणाले की, तालुक्यातील ४७ दिव्यांग विद्यार्थ्यांना ६ व्हीलचेअर, १९ सीपी चेअर, १ ट्राइसिकल आदी साहित्य वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व केंद्रप्रमुख, विषय तज्ञ, दिव्यांग बालक व पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर जि.प. अध्यक्ष वानखेडे यांनी स्पीच थेरपी रूमला भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटसाधन केंद्रातील शेख शब्बीर, ज्ञानेश्वर गोराडे, संदीप कळम, दिलीप जंजाळ, अपर्णा इंगळे, चंद्रशेखर देशमुख, संदीप देशमुख, संतोष काकडे, नंदकिशोर शेटे आदींनी परीश्रम घेतले.