मुंबईला ड्युटी? नको रे बाबा! एसटीच्या चालक-वाहकांचा नकार (त्यामुळे मुंबईला ड्युटी? नको रे बाबा! असा आटोह वाहक व चालक करीत आहेत... या वाक्यातील ‘आटोह’ शब्द कळत नाही. कृपया पाहून घेणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST2021-04-04T04:31:01+5:302021-04-04T04:31:01+5:30
मुंबईला गेलेल्या वाहक व चालकांपैकी १७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबई येथील लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांना ठरावीक वेळेतच ...

मुंबईला ड्युटी? नको रे बाबा! एसटीच्या चालक-वाहकांचा नकार (त्यामुळे मुंबईला ड्युटी? नको रे बाबा! असा आटोह वाहक व चालक करीत आहेत... या वाक्यातील ‘आटोह’ शब्द कळत नाही. कृपया पाहून घेणे.)
मुंबईला गेलेल्या वाहक व चालकांपैकी १७ जणांना कोरोनाची लागण झाली होती.
मुंबई येथील लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांना ठरावीक वेळेतच सुरू असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने बसेस वाढविल्या आहेत. यासाठी राज्यातील सर्वच विभागांतून चालक, वाहक, कर्मचारी यांना बोलावले जात आहे. सुरुवातीच्या काळात कर्मचारी गेले नाहीत. त्यामुळे रापमने त्यांच्यावर कारवाया केल्या. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी गुपचूप मुंबई गाठली. परतल्यावर त्यांची कोरोना चाचणी केली असता, आतापर्यंत १७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. जालना जिल्ह्यातील ८६० चालक-वाहक व ६० प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुंबई येथे पाठविण्यात आले होते. १५ दिवस सेवा बजावल्यानंतर हे सर्व लोक जालना विभागात पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
परत आल्यानंतर अनेकांना झाला त्रास
मुंबईतील बेस्टची सेवा बजावून परत आलेल्या अनेक चालक व वाहकांना त्रास झाला. काहींना ताप आला होता. तर यातील १७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.
मी मुंबईला गेलो होतो. परंतु, तेथे कसल्याच सुविधा मिळत नाहीत. भत्ताही मिळत नाही. परत आल्यानंतर मी कोरोना पॉझिटिव्हदेखील निघालो. आता पुन्हा मुंबईला बोलाविण्याची शक्यता आहे. मी जाण्यासाठी नकार दिला आहे, असे एका कोरोना पॉझिटिव्ह वाहकाने सांगितले.
मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने आम्हाला पुन्हा मुंबईला पाठवू नये. तसे आदेश जरी आले तरी आम्ही मुंबईला जाण्यासाठी तयार नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
मुंबई येथे गेल्यानंतर वाहक व चालकांना सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. त्यामुळे जालना विभागातील कर्मचाऱ्यांना मुंबई येथे पाठवू नये. तशा तक्रारी आमच्याकडे आल्या नाहीत, असे एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.