शिवरायांच्या जयघोषाणने दुमदुमला जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:19 IST2021-02-22T04:19:14+5:302021-02-22T04:19:14+5:30

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीवर विविध निर्बंध घालण्यात आले होते. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करताना शिवभक्तांचा ...

Dumdumla district with the proclamation of Shivaraya | शिवरायांच्या जयघोषाणने दुमदुमला जिल्हा

शिवरायांच्या जयघोषाणने दुमदुमला जिल्हा

जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीवर विविध निर्बंध घालण्यात आले होते. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करताना शिवभक्तांचा उत्साह कायम होता. मिरवणुका रद्द करण्यात आल्या असल्या तरी जिल्हाभरातील शिवभक्तांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवरायांना अभिवादन केले.

वज्रखेडा येथे विविध उपक्रम

हसनाबाद : भोकरदन तालुक्यातील वज्रखेडा येथे शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामपंचायतीत प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच महेंद्र पगारे, जिल्हा परिषद सदस्य गणेश फुके, शिवव्याख्याते ज्ञानेश्वर फुके, देविदास गिरी महाराज, मधुकर फुके, रावसाहेब फुके, उत्तम फुके, माजी सरपंच शालिक फुके आदींची उपस्थिती होती.

माहोरा गावामध्ये विविध उपक्रम

माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली. केंद्रीय प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषकुमार गौरकर, प्रशालाचे मुख्याध्यापक अनिल गवई, केंद्रप्रमुख डी. के. सोनुने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गव्हले, शिक्षक बी. बी. खांडेभराड, मधुकर इंगळे, अर्चना भांडेकर, एस. आर. गरडबडे, सुमन गिरी आदींची उपस्थिती होती.

ग्रामसंसद, माहोरा

माहोरा : येथील ग्रामसंसद कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष बोरसे, डॉ. रवींद्र कासोद, उपसरपंच गजानन साळोक, बाबूराव डोंगरदिवे, नवलसिंग राजपूत, सय्यद शब्बीर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद हायस्कूल, माहोरा

माहोरा : येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष वरपे, मुख्याध्यापक कृष्णा चेके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुखदेव अवकाळे, आदर्श शिक्षक जयकुमार सोनवणे, गणेश पवार, रामेश्वर खलसे व इतरांची उपस्थिती होती.

वरूड खुर्द येथे कार्यक्रम

माहोरा : वरूड खुर्द येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह इतर उपक्रम राबविण्यात आले. यावेळी तहसीलदार सतीश सोनी, पोलीस अधीक्षक अभिजित मोरे, शिवसेना उप जिल्हाप्रमुख रमेश पाटील, पंचायत समिती सभापती विमलबाई गोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष रामधन कंळबे, राजेश म्हस्के, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गजू लोखंडे, पिंपळगावचे सरपंच दता कड, विलास कोल्हे, डिगांबर कोरडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

माहेरजवळा येथे अभिवादन

पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील माहेरजवळा येथे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच सुनीता भोसले, उपसरपंच पल्लवी पवार, सुधाकर भोसले, संजय पवार, रामदास सरोदे, ज्ञानेश्वर शिंदे, जगन आरवे, बबन भोसले आदींची उपस्थिती होती.

मत्स्योदरी महाविद्यालय

अंबड : शहरातील मत्स्योदरी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. जंगले, प्रा. उबाळे, प्रा. वादे, प्रा.तौर, प्रा.भुतेकर, प्रा. सुरासे, प्रा. राखुंडे, प्रा.पैठणे, प्रा. खरात आदींची उपस्थिती होती.

फाईन आर्ट कॉलेज, जालना

जालना : शहरातील फाईन आर्ट कॉलेजमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास अनंत मोहिते, रवी खोमणे, संजय हिवरेकर, दिनानाथ पवार, बाळू दांडगे, बद्रीनाथ मोहिते, ऋषी निकम, अविनाश पालवे, बालाजी कालालडे, अमोल पाटील आदींची उपस्थिती होती.

राजे शिवाजी इंग्लिश स्कूल

रोहिलागड : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील राजे शिवाजी इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका खिल्लाडे, गाडेकर, प्रा. नरेश शिंदे, भरत पाटील आदींची उपस्थिती होती.

खोमणे महाविद्यालय

जालना : तालुक्यातील नाव्हा येथील कै. संतुकराव खोमणे महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. अश्विनी क्षिरसागर, प्रा. चंद्ररेखा गोस्वामी, प्रा. गजानन कदम, निशांत गिते, सिद्धार्थ पारचा, भगवान भुतेकर आदींची उपस्थिती होती.

अहंकार देऊळगाव येथे कार्यक्रम

जालना : तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे युवाशक्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस अमोल खरात, ग्रा.पं. सदस्य राजू खरात, बबन वाहुळ, विलास खरात, राहुल खरात, रुपेश खरात आदींची उपस्थिती होती.

Web Title: Dumdumla district with the proclamation of Shivaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.