मुसळधार पावसामुळे नद्यांनी पात्र सोडले; जाफराबाद रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतून ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 02:44 PM2021-09-28T14:44:15+5:302021-09-28T14:45:39+5:30

rain in Jalana जनजीवन विस्कळीत होऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले

Due to torrential rains the rivers left the basin; The bridge on Jafrabad Road went under water and the traffic was jammed | मुसळधार पावसामुळे नद्यांनी पात्र सोडले; जाफराबाद रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतून ठप्प

मुसळधार पावसामुळे नद्यांनी पात्र सोडले; जाफराबाद रोडवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतून ठप्प

Next

भोकरदन ( जालना ) : तालुक्यात रात्री झालेल्या धुव्वाधार पावसाने दाणादाण उडाली आहे. या पावासामुळे पूर्णा, केळना, गिरजा, जुई, रायघोळ, धामना या नद्यांना मोठे पूर आले आहेत. सर्वच नद्यांनी पात्र सोडले असल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तर भोकरदन शहरातुन वाहणाऱ्या केळना नदीला आलेल्या पुरामुळे जाफराबाद रोडवरील पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे भोकरदन ते बुलढाणा- चिखली रस्ता बंद झाला असून पोलिसांनी या रस्त्यावरील वाहतूक बंद केली आहे.

सोमवारी रात्री भोकरदन, सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मंगळवारी सकाळी या परिसरातील सर्वच नद्यांना पूर आला. जनजीवन विस्कळीत होऊन खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शहरातील केळना नदीवरील पुलाचे काम सुरू असून या पुलावर काम करीत असलेली एक मशीन नदीपात्रात वाहून जाण्याच्या स्थितीत आहे, तर न्यायालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामासाठी खोदलेल्या खड्यात रात्री माल ट्रक गेला. त्यामुळे ट्रकचे नुकसान झाले आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राकदार यांनी फलक न लावल्यामुळे हा अपघात झाला आहे.

पंधरा वर्षानंतर पूल पाण्याखाली
भोकरदन ते  जाफराबाद रोडवरील केळना नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे या पुलावर 32 ते 3 फूट पाणी आहे, यापूर्वी 2006 मध्ये या पुलावर पाणी आले होते त्यानंतर तब्बल 15 वर्षानंतर हा पूल पाण्याखाली गेला आहे तसेच म्हाडा कॉलनी व बसस्टँड च्या बाजूने येणारे नाले नागरिकांनी अतिक्रमण करून अरुंद केल्यामुळे या नाल्याच्या पुरामुळे रफिक कॉलनी, हबीब कॉलनी,बाजारपेठ या परिसरातील घरात पाणी शिरले आहे, तुळजाभवानी नागरकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले आहे, 
 

Web Title: Due to torrential rains the rivers left the basin; The bridge on Jafrabad Road went under water and the traffic was jammed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.