शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीत घर कोसळल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्याचा संसार उघड्यावर, दहा शेळ्याही दगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 16:02 IST

संततधार पावसाने मातीचे घर कोसळले. त्यात घरासमोर बांधलेल्या दहा शेळ्यांच्या अंगावर घराची भिंत पडल्याने त्या गतप्राण झाल्या.

- गणेश पंडितकेदारखेडा (जालना) : भोकरदन तालुक्यातील कोदोली येथील एका शेतकऱ्याचे शनिवारी सकाळी अतिवृष्टीमुळे घर कोसळले. या घटनेत त्यांच्या दहा शेळ्या दबून जागीच ठार झाल्या. सुखदेव त्रिंबक गिरणारे असे आपत्तीग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून, ऐन दिवाळीच्या दिवशी त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. 

केदारखेडा परिसरात गेल्या दोन, दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संततधार पावसात पशुपालक सुखदेव गिरणारे यांचे मातीचे घर कोसळले. घरासमोर बांधलेल्या दहा शेळ्यांच्या अंगावर घराची भिंत पडल्याने त्या गतप्राण झाल्या. ऐन दिवाळीच्या तोंडावर निवारा आणि पशुधन हातचे गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले. यात त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा तलाठी पी.बी.समिंद्रे यांनी पंचनामा केला असून वरिष्ठांना नुकसानीचा अहवाल सादर केला आहे.  

आपत्तीग्रस्त शेतकरी गिरणारे हे अल्पभूधारक आहेत. त्यांनी जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केलेला आहे. अतिवृष्टीत शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे ते आधीच खचलेले असताना त्यांचे पशुधनही अतिवृष्टीमुळे हिरावून नेले. ऐन दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांचा सर्व संसार मातीत मिसळल्याने ते हवालदिल झाले आहे. ते राहत असलेल्या घरावर जुन्या गढीची दरड कोसळल्याने हा अपघात झाला. यात घरातील संसारोपयोगी साहित्य व धान्याचे नुकसान झाले. घरापुढे बांधलेल्या दहा शेळ्या ढिगाऱ्याखाली दबल्याने त्यांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी ३ शेळ्या उकरून काढल्या. परंतु, त्यांनीही प्राण सोडला होता. या घटनेत त्यांचे अंदाजे ३ लक्ष रुपयाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आपत्तीग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तहसीलदारांना या घटनेची माहिती दिली. गिरणारे कुटुंबाना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अनेकांनी दिला मदतीचा हात दिवाळीच्या तोंडावर गिरणारे कुटुंबावर आलेले संकट लक्षात घेऊन डॉ. चंद्रकांत साबळे यांनी किराणा साहित्य व पाच हजारांची मदत केली. गावातील भगवान गिरणारे यांनी ३ हजार रुपये, ग्रा.पं. सदस्य संजय गिरणारे व चेअरमन गणेश गिरणारे यांनी प्रत्येक १ हजार रुपये, रामेश्वर गिरणारे व विनोद शिवाजी गिरणारे यांनी प्रत्येक ५०० रुपये अशी एकूण ११ हजारांची मदत गावकऱ्यांनी गिरणारे कुटुंबाना केली आहे.

टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाFarmerशेतकरी