जुना जालन्यातील गर्दीने रुग्णावाहिकाही अडवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 23:55 IST2017-12-03T23:55:08+5:302017-12-03T23:55:15+5:30
जुना जालन्यातील गांधीचमन चौक ते रेल्वेस्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच बनले आहे. रविवारी दुपारी रेल्वेस्थानक चौकात तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली. यात एक रुग्णवाहिकेसह अप्पर पोलिसांची गाडीही अडकून पडली.

जुना जालन्यातील गर्दीने रुग्णावाहिकाही अडवली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालन्यातील गांधीचमन चौक ते रेल्वेस्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच बनले आहे. रविवारी दुपारी रेल्वेस्थानक चौकात तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली. यात एक रुग्णवाहिकेसह अप्पर पोलिसांची गाडीही अडकून पडली. पुढे जाण्याच्या नादात रुग्णवाहिकेला रस्ता करून दाखविण्याची माणुसकी कुणी दाखवली नाही.
ग्रामीण भागातून येणारा स्वस्त, ताजा भाजीपाला थेट शेतकºयांकडून मिळत असल्याने बाजारात येणाºयांची गर्दीही अधिक असते. मात्र, गत काही महिन्यांपासून या बाजारात काही स्थानिक विक्रेतेही आपली दुकाने थाटत आहेत.
फेरीवाले थेट रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
शिवाय रेल्वेस्थानक चौकात ग्रामीण भागातून येणारी अनेक चारचाकी वाहने जागा मिळेल तिथे उभी केली जात असल्याने बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडी होत आहे. आज दुपारी रेल्वेस्थानक चौकात स्वामी विवेकानंदाच्या पुतळ्याजवळ वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे गांधीचमनकडे बाजारात येणाºया रस्त्यासह मस्तगड चौकाकडे जाणाºया रस्त्यावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली. पुढे जाण्याच्या नादात वाहनधारक रस्ता मिळेल तशी वाहने पुढे नेत असल्याने कोंडी सुटण्याऐवजी आणखीच वाढली.
दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. रेल्वेस्थानकाकडून मस्तगडकडे जाणारी रुग्णवाहिकाही कोंडीत अडकून पडली.
विशेष म्हणजे ऐरवी राज्यमंत्र्यांच्या ताफ्यात भरधाव जाणारी पोलिसांची स्काँटिंग गाडीही वाहतूक कोंडीत सापडली. या ठिकाणी वाहतूक कर्मचारी हजर नसल्यामुळे शेवटी स्थानिक नागरिक व काही रिक्षा चालकांनी रस्त्यावर उतरुन वाहतूक कोंडी सुरळीत केली.