वाळूअभावी ६०० घरकुलांची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:28 IST2021-05-17T04:28:55+5:302021-05-17T04:28:55+5:30
घनसावंगी नगरपंचायतीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तब्बल ८५० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम मांडगे यांनी घरकुलांसाठी वाळूची ...

वाळूअभावी ६०० घरकुलांची कामे रखडली
घनसावंगी नगरपंचायतीमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तब्बल ८५० घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विक्रम मांडगे यांनी घरकुलांसाठी वाळूची मान्यता दिली होती, परंतु संबंधित लाभार्थ्यांना वाळू वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बहुतांश जणांच्या घरांची कामे यामुळे रखडली आहेत. पावसाळा तोंडावर आला असून, पावसाळ्यात वाळू मिळणे कठीण होते. या काळात भावही गगनाला भिडतात. पावसाळ्यापूर्वी वाळू मिळाली नाही, तर घरकुलांचे काम या वर्षीही होणार नाही. यासाठी पोलीस प्रशासनाने लाभार्थ्यांना वाळू वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. या विषयीचे निवेदन शिवसेनेचे पदाधिकारी राम बिडे, अशोक शेलारे, कृष्णा वराडे, बापू कथले, गणेश साळवे, गणेश कथले, शिवाजी उबाळे आदींनी दिले.