सभासदांच्या प्रचंड विश्वासामुळे पतसंस्था स्वत:च्या पायावर उभी राहिली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:43+5:302021-02-05T07:59:43+5:30
टेंभुर्णी : मागील पाच वर्षांत सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याने विद्यमान संचालक मंडळाबद्दल प्रचंड विश्वास सभासदांच्या मनात निर्माण झाला. ...

सभासदांच्या प्रचंड विश्वासामुळे पतसंस्था स्वत:च्या पायावर उभी राहिली
टेंभुर्णी : मागील पाच वर्षांत सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतल्याने विद्यमान संचालक मंडळाबद्दल प्रचंड विश्वास सभासदांच्या मनात निर्माण झाला. या विश्वासातूनच आज सभासदांनी ३ कोटींपेक्षा अधिकच्या ठेवी पतसंस्थेत ठेवल्या आहेत. वाढते भागभांडवल व ठेवीचा वाढता ओघ यामुळे आता कुठल्याही बँकेचे कर्ज न घेता पतसंस्था स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. भविष्यातही सभासदांच्या या विश्वासाला कुठेही तडा जावू देणार नाही, असे विचार जाफराबाद जि. प. शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुखदेव अवकाळे यांनी व्यक्त केले. पतसंस्थेच्या प्रांगणात शनिवारी संपन्न झालेल्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी मदन आंधळे, सखाराम नवले, कडूबा जाधव, शंकरनाना लहाने, शिक्षक नेते संजय लहाने, अनिल गवई, व्हाईस चेअरमन विनोद कळंबे, मानद सचिव अभिजित साळवे सुधाकर चिंधोटे, प्रदीप साळोख, बळीराम उबरहंडे, गणेश सोनुने, मुमताज पठाण, वसंत शेवाळे, डी.ई.नागरे, गणेश तायडे, गजानन चाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना मदन आंधळे यांनीही पतसंस्थेच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश पवार आणि श्रीकृष्ण चेके यांचा गौरव करण्यात आला. सेवानिवृत्तीबद्दल मदन आंधळे, सुधीर जोशी, बी. बी. पवार, छगन भुतेकर, चरावंडे, पी. एस. शिंदे, सलीम पठाण, वामन सोनवणे, भगवान रक्ताडे आदींचा सेवागौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतीय वनसेवेतील यशाबद्दल अक्षय दिनकर भोसले, वैद्यकीय सेवेतील गुणवंत मकरंद श्रीपाद देशपांडे, शुभम देवीदास वाघ, पवन पृथ्वीराज तळेकर, नागेश रमेश साळवे, राजनंदिनी रमेश शेळके, सायली गजानन शिंदे, वैभव शिंदे, समृद्धी भाग्यवंत यांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन विनोद कळंबे यांनी केले तर सावता तिडके व अभिजित साळवे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संचालक कारभारी चाटे, संजय निकम, किरण तिडके, गणेश पवार, सावता तिडके, भगवान भालके, दीपक चव्हाण, प्रतिभा गवई, दीपा वाकोडे, दत्तू मुनेमाणिक, भास्कर शिंदे, सचिव श्रीराम देठे, प्रवीण अंभोरे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो- जाफराबाद जि. प. शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन सुखदेव अवकाळे.