शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Drought In Marathwada : पांढरे सोने पिकविणाऱ्या वाकुळणीत दुष्काळझळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 12:22 IST

दुष्काळवाडा : बदनापूर तालुक्यातील वाकुळणी हे पांढरे सोने पिकविणारे गाव म्हणून तालुक्यात ओळखले जाते.

- दिलीप सारडा, वाकुळणी, ता. बदनापूर, जि. जालना

बदनापूर तालुक्यातील वाकुळणी हे पांढरे सोने पिकविणारे गाव म्हणून तालुक्यात ओळखले जाते. यंदा चांगला पाऊस पडेल अशी हवामान खात्याने वल्गना केल्याने परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. मात्र पुरेशा पावसाअभावी कपाशीसह इतर पीकही शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने पांढरे सोने पिकविणाऱ्या वाकुळणीत दुष्काळाचा काळोख पसरला आहे.

पिकांच्या पेरणी व मशागतीकरिता शेतकऱ्यांनी विविध बँका, खाजगी सावकारांकडून चक्रवाढ व्याजाने कर्ज काढले. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगामाची पिके गेली आहे. या गावची आणेवारी ४५ एवढी आहे. शेतकऱ्यांनी आपल्या घरात जेवढे पैसे होते तेवढे शेतीत लावल्यामुळे व आता शेतातून कवडीचेही उत्पन्न येणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बँकेचे आणि सावकाराचे कर्ज कसे फेडणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. रबीच्या उत्पन्नातून ही तूट भरून काढू, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र परतीच्या पावसाने दडी मारल्याने परिसरात रबीच्या पेरण्या खोळंबल्या. पुरेसा पाऊस न पडल्याने शेतात जनावरांसाठी चारा नाही. नदी-नाले कोरडेठाक पडल्याने पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. मुक्या जनावरांना खायला चारा नाही. कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून, त्याचा चारा म्हणूनदेखील उपयोग होत नाही. वाळलेले गवतसुद्धा शेतात नसल्यामुळे पुढे पशुधन कसे जगवायचे हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे. 

- ४८३.३० मि. मी. पाऊस तालुक्यात यंदा पडला आहे- ६८५- मि.मी. इतकी तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी आहे - १२२८,५६ - हेक्टर इतके एकूण भौगोलिक क्षेत्र वाकुळणी या गावाचे आहे- ११४४.९७ - हेक्टर लागवडीलायक क्षेत्र - ७३३ - हेक्टरमध्ये कापूस- २७- हेक्टरवर तूर - ९ - हेक्टर उडीद-१४५ - हेक्टर सोयाबीन- २१ - हेक्टर मूग- १८ - हेक्टर बाजरी-६ - हेक्टरवर मका 

मोसंबी, डाळिंब फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर वाकुळणी शिवारात विहिरींच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच विहिरी कोरड्या पडत आहेत. या गावातील शेतकऱ्यांनी यावर मात करण्यासाठी सुमारे ६५ ते ७० शेततळे घेतले. शेततळ्याचे गाव अशी प्रतिमा तयार झाली. मात्र यावर्षी पाऊस नसल्यामुळे हे शेततळे कोरडे पडले आहेत. एकेकाळी मोसंबी उत्पादक अशी या गावाची ओळख होती. मात्र आता मोसंबी, डाळिंब अशा फळबागा नष्ट होत आहेत.

बळीराजा काय म्हणतो?

- आमची एकत्र कुटुंब पद्धती असून, मी व माझे मोठे बंधू दोघे शेती करतो. आम्ही आठ एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. बोंडं लागण्याच्या अवस्थेत असताना पाऊस झाला नाही. परिणामी कापसाची वाढ खुंटली. झाडे सुकली. त्यामुळे आमचे शंभर क्विंटल कापसाचे उत्पन्न बुडाले आहे़ - नारायण रामराव अवघड 

- सध्या पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पीक गेले आहे. तसेच जमिनीत ओल नसल्याने रबीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीमालाला शासनाने हमीदरापेक्षा दुपटीने भाव देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढावे.  - बाळासाहेब भानुदास वैद्य 

पुरेशा पावसाअभावी शेतात जनावरांसाठी चारा शिल्लक राहिलेला नाही. आमच्या कुटुंबाकडे किमान १५ जनावरे असून, त्यांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अनेक शेतकरी आता मुक्या जनावरांना सांभाळू शकत नसल्यामुळे आठवडी बाजारात कवडीमोल दराने जनावरांची विक्री करीत आहेत. - प्रमोद संभाजी कोळकर 

- पाण्याअभावी माझी मोसंबी व डाळिंबाची फळबाग जळून गेली. तसेच दहा एकर कापसाची लागवड केलेली असून, पाण्याअभावी कपाशीचे पीकही वाळत आहे. त्यामुळे यावर्षी मी फळबाग, कापूस व अन्य पिकांसाठी लावलेला खर्च वाया गेल्याने आर्थिक बजेट बिघडले आहे. - नाथा बाळाजी अवघड 

- हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न समोर येणार आहे. शेतमजुरांच्या हाताला कामे नसल्याने मजुरांचे स्थलांतर वाढले आहे. - किसनअप्पा श्रीरंग कोळकर 

टॅग्स :droughtदुष्काळagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarathwadaमराठवाडा