लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रेल्वेचे डीआरएम त्रिकाल राभा यांनी शनिवारी जालना रेल्वेस्थानकाला भेट दिली. मात्र, त्यांच्यासमोरच रेल्वे येत असतांना प्रवासी आपला जीव धोक्यात टाकून पटरीवरुन ये-जा करत होते. यावेळी येथे रेल्वे अधिकारी व जीआरपी पुलिसही उपस्थित होते. मात्र, त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. डीआरएम त्रिकाल राभा यांनी शनिवारी रेल्वेस्थानकाची पाहाणी करुन येथील रेल्वे दवाखान्यासमोरील गार्डनमध्ये वृक्षारोपण केले. तसेच त्यांनी बदनापूर, जालना, रांजणी, परतूर रेल्वेस्टेशनची पाहाणी केली. याप्रसंगी एडीईएन एम. प्रभाकराव, आईओडब्ल्यू हरिश कुमार, स्टेशन अधीक्षक ओराम यांच्यासह रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यापुर्वीही अशी पाहणी केल्यानंतरही प्रशासनात कुठलाच फरक पडला नाही.
डीआरएमसमोरच नागरिकांची रेल्वे पटरीवरुन ये-जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:29 IST