वाहनचालकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST2021-02-19T04:20:26+5:302021-02-19T04:20:26+5:30
चालकांना मार्गदर्शन बदनापूर : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बदनापूर येथील वाहनचालकांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक एस. ...

वाहनचालकांची कसरत
चालकांना मार्गदर्शन
बदनापूर : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बदनापूर येथील वाहनचालकांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक एस. एम. झाडबुके यांनी मार्गदर्शन केले. चालकांनी वाहतूक नियम पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
रब्बी पिकांची पाहणी
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड व परिसरातील पिकांची उपविभागीय कृषी अधिकारी गजानन सोनकांबळे यांनी पाहणी केली. गहू, फळपिकांची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
रब्बीतील पिके धोक्यात
मंठा : महावितरण कंपनीने थकीत वीज बिलामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाले असून, रब्बीतील हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
धोकादायक डीपी
जालना : शहरातील विविध भागात मुख्य रस्त्यालगत असलेल्या विद्युत डीपी सताड उघड्या आहेत. रस्त्यालगत या विद्युत डीपी असल्याने अपघाताचा धोका वाढला असून, संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.