चालकांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:11+5:302021-07-31T04:30:11+5:30

वृक्षारोपण कार्यक्रम भोकरदन : तालुक्यातील बाभूळगाव जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, विठ्ठल ...

Driver's workout | चालकांची कसरत

चालकांची कसरत

वृक्षारोपण कार्यक्रम

भोकरदन : तालुक्यातील बाभूळगाव जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, विठ्ठल राऊत, विशाल गाढे, भानुदास सोळंके, मुख्याध्यापक दळवी व इतरांची उपस्थिती होती.

प्रवाशांची गैरसोय

अंबड : तालुक्यातील अनेक गावांतील बससेवा अद्यापही बंद आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ही बससेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही बाब पाहता संबंधित आगारप्रमुखांनी लक्ष देऊन बंद असलेल्या बस पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

रस्ता दुरुस्तीची मागणी

जाफराबाद : तालुक्यातील अनेक शेतरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. शेतकऱ्यांचे पावसाळ्यात हाल होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतरस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी मनोहर भोपळे, दत्तात्रय भोपळे, दत्तात्रय शेळके, गजानन घोडके आदींनी केली आहे.

मोकाट जनावरांचा वावर

जालना : शहरांतर्गत प्रमुख मार्गावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसत आहेत. मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी होत असून, पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही बाब पाहता संबंधितांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Driver's workout