चालकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST2021-02-27T04:41:16+5:302021-02-27T04:41:16+5:30
रस्त्याची दुरवस्था जालना : शहरांतर्गत भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले असून, रस्त्यांची ...

चालकांची कसरत
रस्त्याची दुरवस्था
जालना : शहरांतर्गत भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले असून, रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
अंबड : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या अवैध वृक्षतोड सुरू आहे. अनेक वाहनांमध्ये तोडलेल्या लाकडांची वाहतूक होताना दिसत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.
सूचना फलक गायब
अंबड : अंबड ते जालना मार्गावरील अनेक ठिकाणचे दिशादर्शक, सूचना फलक गायब झाले आहेत. नामफलकांअभावी चालकांची गैरसोय होत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वालसावंगीत सात रोहित्र नादुरूस्त
वालसावंगी: येथील विविध भागांतील तब्बल सात रोहित्र अनेक दिवसांपासून नादुरूस्त आहे. त्यामुळे गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, रोहित्र दुरूस्त करून न दिल्यास उपोषण करण्याचा इशारा सरपंच कस्तुराबाई कोथळकर यांनी दिला आहे. वालसावंगी येथील सात रोहित्र अनेक दिवसांपासून नादुरूस्त आहेत. हे रोहित्र दुरूस्तीसाठी जालना येथे पाठविण्यात आले. मात्र, अनेक दिवस उलटून देखील अद्यापही गावाला दुरूस्त करून रोहित्र मिळाले नाही.
आठवडे बाजार मार्चअखेरपर्यंत बंद
अंबड : अंबड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सुखापुरीचा आठवडे बाजार मार्चपर्यंत बंद राहणार आहे. या ठिकाणी परिसरातील लखमापुरी, कुक्कडगाव, बेलगाव, वडीकाळ्या, दहिगाव, रूई रेवलगाव, सिरसगाव, करंजाळा, मठतांडा आदी ग्रामस्थ बाजारासाठी येतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
श्रीराम मंदिरासाठी निधीचे संकलन
कुंभार पिंपळगाव: अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण करण्यासाठी परिसरात निधी संकलन अभियान राबविण्यात आले. यात परिसरातील १२ गावात सहा लाख ५१ हजार ७८४ रूपयांचा निधी जमा करण्यात आला. या निधीची येथील पाहुणा मारोती मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली. हा निधी बॅंक खात्यात जमा करण्यात आला. १२ गावांमधून १६१ स्वयंसेवकांनी दोन हजार ६७३ कुटुंबातील सदस्यांकडून हा निधी संकलित करण्यात आला.
खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय
जालना : महावितरण कंपनीकडून थकीत वीज बिलापोटी कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हाती आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तरी संबंधितांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
मासेगाव येथे विश्वकर्मा जयंती
घनसावंगी : तालुक्यातील मासेगाव येथे श्री विश्वकर्मा यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छगन आनंदे, महादेव साबळे, राम साबळे, मुंजाभाऊ आनंदे आदींची उपस्थिती होती.
अकोला देव येथे उमेद घरकूल मार्ट
जाफराबाद : अकोलादेव येथे नारी शक्ती महिला स्वयं सहायता गटाच्या उमेद घरकूल मार्टचे उद्घाटन गटविकास अधिकारी विष्णू बोडखे यांच्या हस्ते गुरूवारी करण्यात आले. याप्रसंगी विस्तार अधिकारी एन. टी. खिल्लारे, जाधव, ग्रामविकास अधिकारी चव्हाण, विकास घोडसे, रामेश्वर सवडे, कृष्णा बनसोडे, सुनीता देशमुख, संगीता बोर्डे यांची उपस्थिती होती.
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
घनसावंगी : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री, मटा, जुगार आदी अवैध धंदे जोमात सुरू आहेत. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. व्यसनांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विस्कळीत सेवेमुळे मोबाईल धारक त्रस्त
अंबड : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. विस्कळीत सेवेमुळे ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. इंटरनेट अभावी शासकीय, निमशासकीय कामावर परिणाम होत असून, सुरळीत सेवा पुरवावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर खड्डे
जालना : रेल्वेस्थानक ते मंमादेवी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.