चालकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:04+5:302021-02-13T04:29:04+5:30
मोकाट जनावरांचा ठिय्या जालना : शहरातील प्रमुख मार्गासह बाजारपेठेतील रस्त्यावर मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी ...

चालकांची कसरत
मोकाट जनावरांचा ठिय्या
जालना : शहरातील प्रमुख मार्गासह बाजारपेठेतील रस्त्यावर मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
अवैध दारूविक्री जोमात
जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. तळीरामांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वाहतूक नियमांची जागृती
जालना : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी वाहन चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. प्रदीप हुसे, सचिन झाडबुके, हनुमंत सुळे आदींची उपस्थिती होती.
धोकादायक डीपी
जालना : शहरातील मुख्य मार्गावर असलेले अनेक विद्युत डीपी सतत उघडे राहत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, संबंधितांनी हे डीपी कुलूप बंद ठेवावेत, अशी मागणी होत आहे.