चालकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:55+5:302021-01-08T05:39:55+5:30
महामार्गावर अतिक्रमण बदनापूर : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वाहनचालक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने ...

चालकांची कसरत
महामार्गावर अतिक्रमण
बदनापूर : शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वाहनचालक रस्त्यावर वाहने उभी करत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कारवाईची मागणी
मंठा : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तळीरामांमुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, महिलांनाही त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
जालना : शहरातील गिरधारेश्वर मंदिराच्या मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोपाल ठोंबरे, मारोती शेरकर, गणेश ढोबळे, दीपक वाघ आदी उपस्थित होते.
रस्त्याची दुरवस्था
सातोना : परतूर तालुक्यातील वरफळ ते रेवलगाव या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे चालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे.