डॉ. जयश्री कुमावत यांच्या ग्रंथाचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:00 IST2021-02-05T08:00:26+5:302021-02-05T08:00:26+5:30
यावेळी इंद्रराज कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सिल्लोडचे हिंदी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. प्रमोद पाटील, वेदांत तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. प्रमोद कुमावत ...

डॉ. जयश्री कुमावत यांच्या ग्रंथाचे प्रकाशन
यावेळी इंद्रराज कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सिल्लोडचे हिंदी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. प्रमोद पाटील, वेदांत तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. प्रमोद कुमावत उपस्थित होते. डॉ. किनारीवाल या सोनलनगर जालना येथील संत साहित्याच्या अभ्यासिका व चैतन्य साधना आणि रिसर्च फाऊंडेशनच्या सचिव आहेत. मध्ययुगीन कालखंडातील मराठी वारकरी संत व उत्तरेकडील हिंदी संतांचा तौलनिक अभ्यास करणे ही मोलाची कामगिरी असून त्यावर संशोधकांनी काम केले पाहिजे, असे मत डॉ. माधव सोनटक्के यांनी व्यक्त केले. डॉ. जयश्री किनारीवाल यांनी मराठी स्त्री संत जनाबाई व हिंदी स्त्री संत मीराबाई यांच्या काव्याचा तौलनिक अभ्यास केला आहे. यामुळे संत जनाबाईंच्या साहित्याचा हिंदी भाषिकांना अभ्यास करणे सुलभ झाले आहे. डॉ. किनारीवाल यांचे रेणुका लाहोरे, संजीवनी वाघमारे, कविता नामेवार, सुरेखा मोरे, अंजली इंगळे आदींनी अभिनंदन केले.