शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 15:16 IST

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

वडीगोद्री ( जालना): "शेतकऱ्यांची सहनशीलता सरकारने पाहू नये. माझ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड वेदना आहेत, त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. पण काळजी करू नका, नुकसान भरपाई यांच्या छाताडावर बसून घेणार आहे." असे आश्वासन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिले. शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितले की, "आज जितके शक्य आहे, तितके मी फिरणार आहे. मी राजकारणी नाही की दौरा लिहून घेईन, जे रस्त्यात दिसेल त्या नुकसानीची मी पाहणी करणार आणि शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांना कळवणार."

मालवण आणि पुणे दौरा आटोपून अंतरवाली सराटीत दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या परिस्थिती पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीची स्वत: पाहणी करून मुख्यमंत्र्यांपर्यंत ते पोहोचवणार, असे जरांगे म्हणाले. त्यांनी अंतरवाली सराटी येतहे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

जरांगे पाटील यांनी सरकारकडे तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. "निसर्गाने शेतकऱ्यांशी दगा फटका केला आहे, परंतु सरकारने दगा करू नये. सरकारने जर शेतकऱ्यांना वेठीस धरलं, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलताना, जरांगे पाटील म्हणाले, "एसटी कर्मचारी पाठीमागच्या सरकारपासून हाल सोसत आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही त्यांच्या समस्या सुटत नाहीत. एसटी कर्मचारी जनतेची सेवा करतो, त्याच्या मागण्या का मान्य होऊ नयेत? त्यालाही संसार आहे, पण सरकार त्याचा संसार डुबवायला लागले आहे."

जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले की, "एसटी कर्मचाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर सरकारचा कार्यक्रम संपवणार. फडणवीस यांनी आंदोलनांमध्ये पेरलेले लोक आता समस्यांना वाढवण्याचे काम करत आहेत."

शिक्षकांचे प्रश्न, डॉक्टरांचे प्रश्न, मच्छीमारांचा प्रश्न, बारा बलुतेदारांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले. "आता लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झालीच पाहिजे, नाहीतर हा संघर्ष थांबणार नाही," असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांना सरकारसमोर मांडण्याचे आणि त्यांची तातडीने सोडवणूक न झाल्यास संघर्षाला पुढे नेण्याचे इशारा दिला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र