शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'घरं जाळण्याचं स्वप्न पाहू नका,अन्यथा...', मनोज जरांगेंचा ओबीसी आंदोलक वाघमारेंना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 18:48 IST

'नुकसान लाखांचं, मदत ३ हजारांची...' अतिवृष्टीच्या मदतीवरूनही जरांगे यांनी सरकारला सुनावले.

- पवन पवारवडीगोद्री (जालना): ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लागण्याच्या घटनेवरून सुरू झालेल्या वादात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. “माझं घर जाळण्याचं स्वप्न पाहू नका. छगन भुजबळ यांनी घरं जाळायला सांगितले असेल. जर घरं जाळायची स्वप्न पाहिली, तर तुमच्या घरात कुंकू लावायला माणसं राहणार नाहीत,” असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “असले हीजडे धंदे आम्ही करत नाही. आम्ही मराठ्यांची अवलाद आहोत, आम्ही समोरासमोर करतो.” रविवारी रात्री वाघमारे यांची गाडी जाळली गेल्याचा आरोप त्यांनी जरांगे यांच्या समर्थकांवर केला होता आणि “जर जरांगे यांचे घर जाळले, तर आम्हाला काही म्हणू नका,” असा इशाराही दिला होता. यावर जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

‘मुंडेंना रोजगार हमीचं काम द्या’धनंजय मुंडे यांनी ‘मला काही काम द्या,’ अशी मागणी केली होती. यावर जरांगे पाटील यांनी मुंडेंवर थेट हल्लाबोल केला. ते म्हणाले, “धनंजय मुंडेंना रोजगार हमीचं काम द्या, त्यांना बराशी खोदायला पाठवा.” यावेळी त्यांनी अजित पवार यांनाही सोडले नाही. “फक्त मराठ्यांच्या नादी लागू नका, नाहीतर अजित दादांनाही सोडणार नाही, त्यांचाही कार्यक्रम लावणार,” असा इशारा त्यांनी दिला. छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “तो स्वतः लोकांकडून फुकटात काम करून घेतो आणि नंतर अलीबाबासाठी मैदान मोकळं ठेवतो.”

‘भुजबळ नेहमी वाद लावतो, त्याचे पाप त्याला भोगावे लागेल’छगन भुजबळांवर पुन्हा एकदा टीका करताना जरांगे म्हणाले, “त्यांना काय येतं दुसरं. या पापाची फेड करावी लागेल. माझ्या डोक्यावर जनतेचा हात आहे, तर तुमच्या डोक्यावर पापाचा हात आहे. नेहमी वाद लावले, तुम्हाला फार भोगावे लागणार आहे.”

‘काँग्रेसवाल्यांना मराठ्यांचा हिसका दाखवावा लागेल’अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर बोलताना त्यांनी सरकारला मदतीवरून सुनावले. “नुकसान लाखांचं आणि मदत ३ हजारांची असं सरकारने करू नये. निधीची अडचण सांगू नका,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. “त्याला फार बुळबुळ सुटली आहे. काँग्रेसवाल्यांना मराठ्यांचा हिसका दाखवावा लागेल. तुमचं पोट भरलेलं दिसत नाही. तुमचा महाराष्ट्रातून सुपडा साफ करू, तुम्हाला सगळं गुंडाळून दिल्लीला न्यावं लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलChhagan Bhujbalछगन भुजबळDhananjay Mundeधनंजय मुंडे