राजुरेश्वराला सहा लाखांची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:37 IST2019-07-22T00:37:14+5:302019-07-22T00:37:59+5:30
संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील राजुरेश्वर संस्थानला भाविकांकडून ६ लाख १२ हजार ३९२ रूपयांची देणगी मिळाल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार संतोष गोरड यांनी दिली.

राजुरेश्वराला सहा लाखांची देणगी
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : शनिवारी झालेल्या संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील राजुरेश्वर संस्थानला भाविकांकडून ६ लाख १२ हजार ३९२ रूपयांची देणगी मिळाल्याची माहीती संस्थानचे अध्यक्ष तथा भोकरदनचे तहसिलदार संतोष गोरड यांनी दिली.
यात प्रवेश देणगी ७१ हजार ९०० रूपये, अभिषेक देणगी ४५ हजार ९५५ रूपये, बांधकाम देणगी २७ हजार ९९९, वाहनतळ देणगी १५ हजार ३७०, श्री दानपेटी दोन लाख ९० हजार २५०, बांधकाम दानपेटी एक लाख ४७ हजार ३९१ रूपये असे एकूण सहा लाख १२ हजार ३९२ रुपए प्राप्त झाले. चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी राजुरेश्वर मंदिरात दानपेटया उघडल्या असता, वरील देणगी मिळाल्याचे समजले.
यावेळी व्यवस्थापक गणेशराव साबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे, श्रीरामपंच पुंगळे, तलाठी ए.व्हि.कड, देविदास साबळे, ज्ञानेश्वर साबळे, संदिप साबळे, ए.एस.वीर, अंकुश ठोकळ आदी उपस्थित होते.