चारा छावण्या सुरू करण्यास कागदपत्रांचा अडसर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:19 IST2019-03-09T00:19:15+5:302019-03-09T00:19:53+5:30
जिल्ह्यात दुष्काळाने आता टोक गाठले आहे. असे असताना प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असून, जिल्ह्यात आलेले आठही प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी तसेच पडून असल्याने गुरांचे मोठे हाल होत आहेत.

चारा छावण्या सुरू करण्यास कागदपत्रांचा अडसर कायम
जालना : जिल्ह्यात दुष्काळाने आता टोक गाठले आहे. असे असताना प्रशासन मात्र केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असून, जिल्ह्यात आलेले आठही प्रस्ताव कागदपत्रांची पूर्तता न केल्या प्रकरणी तसेच पडून असल्याने गुरांचे मोठे हाल होत आहेत. मात्र ज्यावेळी हे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवतींनाच यासाठी कुठली कागदपत्र आवश्यक आहेत, हे तपासले असते तर ही वेळ आली नसती असे चारा छावण्यांसाठी प्रस्ताव पाठविणाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिलह्यात यंदा दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे. त्यातच चाºयाचे भाव हे गगनाला भिडले असून, ३५ रूपयांना एक कडब्याची पेंडी झाली आहे. त्यामुळे गुरे सांभाळणे आता जिकिरीचे झाले आहे. हे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवून किमान पंधरा दिवस झाले आहेत. असे असतानाही जिल्ह्यात एकही चारा छावणी सुरू झालेले नाही. चारा छावणी सुरू करण्यासाठी एकीकडे राज्य सरकार प्रशासनाला निर्देश देत आहे, मात्र जालना जिल्हा प्रशासन हे त्याकडे दुर्लक्ष करून केवळ कागदी घोडे नाचवितांना दिसत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. ज्या संस्थांनी चारा (पान दोनवर)