डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:21+5:302021-04-08T04:30:21+5:30
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात लसीकरण सुरू आहे. जे लोक नियमित मद्यपान करतात, ते लस घेण्यासाठी जातानाही मद्यपान करून ...

डॉक्टर, लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही?
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात लसीकरण सुरू आहे. जे लोक नियमित मद्यपान करतात, ते लस घेण्यासाठी जातानाही मद्यपान करून जातात. तसेच लस घेतल्यावरही मद्यपान करतात. अशा लोकांना उलटी, सर्दी, ताप आदी लक्षणे व त्रास होण्याची दाट शक्यता असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, ज्या लोकांना लस घेतल्यानंतर त्रास होत आहे, त्यांनी तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसेच लसीबद्दल कसलाही गैरसमज न आणता इतरांनाही प्रोत्साहित करावे, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
मद्यपान करू नये
शासनाच्या मद्यपानाबद्दल लिखित स्वरूपात काहीच सूचना केल्या नाहीत. मात्र, लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर काहीच दिवस मद्यपान टाळावे, असे सांगण्यात आले आहे. मद्यपान केल्यानंतर त्रास होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मद्यपान करू नये, असे सांगण्यात आले आहे.
मद्यपान करणे तसे शरीरासाठी घातकच असते. परंतु, जे कोण करतात, त्यांनी लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतरही मद्यपान करणे चुकीचे आहे.
विवेक खतगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी
लसीकरणानंतर मद्यपान करण्याबद्दल तशा काही गाइडलाइन्स नसल्या, तरी अल्कोहोल घेऊ नये, असे सांगण्यात आलेले आहे. लस घेताना किंवा नंतर मद्यपान केल्यास त्रास होण्याची दाट शक्यता असते.
राहुल बागुल, वैद्यकीय अधिकारी