राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:33+5:302021-09-03T04:30:33+5:30

शहरातील भक्तनगर रेवगाव रोडवरील गुरू रामचरण उस्ताद भक्त कुस्ती आखाड्यात ही निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील ...

District team announced for state level championship wrestling competition | राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर

राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर

शहरातील भक्तनगर रेवगाव रोडवरील गुरू रामचरण उस्ताद भक्त कुस्ती आखाड्यात ही निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्ह्यातील १७२ मल्लांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी ज्येष्ठ पहेलवान व समाजसेवक मदनलाल भगत यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. दयानंद भक्त, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण सुपारकर, उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे, शाहू पैलवान, विधिज्ञ मारोती आटोळे, विधिज्ञ योगेश खर्डेकर, प्रतीक भक्त, परख भक्त, सदानंद भक्त, ब्रजेश शर्मा, मुकुंद लहाने, गौतम बाळराज, रमेश थोरवे, गजानन यज्ञेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. पंच म्हणून प्रा. मंगेश डोंगरे, प्रा. डॉ. शाम काबुलीवाले, कमलेश सुपारकर यांनी काम पाहिले.

यावेळी फ्री-स्टाईल मुलांच्या संघात ५७ किलो वजन गटात रितेश नाईक, मोहन सरकटे (६१ किलो), गणेश राठोड (६५ किलो), शुभम भद्रे (७० किलो), संदीप काटकर (७४ किलो), वैभव थोरवे (७९ किलो), सयाजी बाळराज (९२ किलो), अमोल राऊत (९७ किलो), ग्रीको रोमनमध्ये विश्वजित कुदळे (५५ किलो), अर्जुन काळे (६० किलो), अर्शद (६३ किलो), सुवेद शिंदे (६७ किलो), संतोष येऊळ (७२ किलो), शुभम गत्ते (८२ किलो), सुशील पांगारकर (९७ किलो) यांची निवड करण्यात आली. मुलींमध्ये ७२ किलो वजन गटात प्रियंका घुशींगे हिची निवड करण्यात आली आहे.

फोटो

Web Title: District team announced for state level championship wrestling competition