जालना पालिकेच्या कारवाईवर जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:36+5:302021-03-26T04:29:36+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची स्वॅब संकलन केंद्राला भेट जालना : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जालना पालिकेने स्वतंत्र स्वॅब संकलन केंद्र स्थापन ...

जालना पालिकेच्या कारवाईवर जिल्हाधिकाऱ्यांची नाराजी
जिल्हाधिकाऱ्यांची स्वॅब संकलन केंद्राला भेट
जालना : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जालना पालिकेने स्वतंत्र स्वॅब संकलन केंद्र स्थापन केले आहे. या केंद्रास जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गुरूवारी सकाळी भेट दिली. तसेच तेथील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी जालन्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी भेट देऊन उपस्थितांना सूचना केल्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी शीतल सोनी यांनी येथील केंद्रात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
दरम्यान, आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये जे स्वॅब घेतले जात होते. ते आता तेथे न घेता सर्व स्वॅब हे एसआरपीफच्या क्वारंटाइन सेंटरच्या खालील इमारतीत घेण्यात येणार आहे. पहिल्याच दिवशी ९८ स्वॅब घेण्यात आल्याची माहिती डॉ. सोनी यांनी दिली.
चौकट
येथेच फिव्हर क्लिनिक आणि सल्ला केंद्र
जिल्हा रुग्णालयातील स्वॅब सेंटरप्रमाणेच याच केंद्रात फिव्हर क्लिनिकदेखील सुरू केले आहे. त्यामुळे ज्यांना सर्दी, ताप असेल त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना वैद्यकीय सल्लाही देण्यात येऊन होम आयसोलेशन हवे असल्यास तसा अर्ज भरून द्यावा लागणार आहे. हे सेंटर सुरू करण्यामागे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढाकार घेतल्याचे डॉ. सोनी यांनी नमूद केले.