विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST2021-02-14T04:28:04+5:302021-02-14T04:28:04+5:30
जालना : पळसखेडा ठोंबरे येथील प्राथमिक शाळेतील १०३ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी भगवान ठोंबरे, गणपत ठोंबरे, ज्ञानेश्वर ...

विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप
जालना : पळसखेडा ठोंबरे येथील प्राथमिक शाळेतील १०३ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी भगवान ठोंबरे, गणपत ठोंबरे, ज्ञानेश्वर ठोंबरे, जगन काळे, अर्जुन ठोंबरे, पंढरीनाथ ठोंबरे, राजू काळे, अंकुश काळे, नितीन काळे, विष्णू गायकवाड, मनसुब गायकवाड, उत्तम इंगळे, विनोद दाभाडे, सुनीता फलके आदी उपस्थित होते.
वेतनासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे उपोषण
परतूर : पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकीत आहे. हे वेतन तातडीने मिळावे, या मागणीसाठी गुरूवारी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी हारूनखान पठाण, मनोहर शेजूळ, जसबीर शेरियार, कालिया चावरिया, महेंद्र चांडलिया, काशिनाथ जाधव, कमलाकर पाडेवार, राजेश सवने, राजेंद्र कांबळे, हिरालाल राजपूत आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम
केदारखेडा : येथील श्री रामेश्वर विद्यालयात क्षयरोगमुक्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एम. एन. सुटे, एस. एस. खंडागळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला व्ही. एन. धसाळ, के. के. सोरमारे, पी. बी. इंगळे, नितीन तळेकर, संदीप पोटे, केशव खेडेकर, विजय वाघ, श्रीराम मुरकुटे, मिलिंद सावंत, आर. के. जाधव, विनोद तांगडे आदी उपस्थित होते.
सिंधीकाळेगाव येथील मोहिते यांचा सत्कार
जालना : तालुक्यातील सिंधीकाळेगाव येथील सीताबाई मोहिते यांना यशवंतराव प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुभाष गिराम, उपसरपंच रशीद सय्यद, ग्रामपंचायत सदस्य विष्णूपंत गिराम, भागवत गिराम, राजाभाऊ मोहिते व ग्रामस्थ उपस्थित होते.