तृतीयपंथीयांना साड्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:26 IST2021-01-02T04:26:08+5:302021-01-02T04:26:08+5:30
वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम जालना : भीमा-कोरेगाव शौर्य दिनासह नूतन वर्षानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना शहरातील तृतीयपंथीयांना साड्यांचे ...

तृतीयपंथीयांना साड्यांचे वाटप
वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम
जालना : भीमा-कोरेगाव शौर्य दिनासह नूतन वर्षानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना शहरातील तृतीयपंथीयांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
वसुंधरानगरात वंचित बहुजन आघाडीचे नेते सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, दीपक डोके, कैलास रत्नपारखे, संतोष तूपसुंदर, रवी कांबळे, प्रशांत भांगरे, धर्मेश कणिसे, राज रत्नपारखे, कुणाल खिल्लारे, राजू दाहिजे, मनोज म्हस्के, मनोज कांबळे, विकास खरात, भरत येडे, अनिल रत्नपारखे आदींची उपस्थिती होती. यावेळी सचिन कांबळे म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ आली होती, सरकारने या तृतीयपंथीयांची दखल घेतली नाही, त्यांना वाऱ्यावर सोडले. वंचित बहुजन आघाडी तृतीयपंथीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. समाजाने तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, तसेच शासनाने तृतीयपंथीयांच्या विकासासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही कांबळे यांनी केले. याप्रसंगी तृतीयपंथी ज्युली सूर्यवंशी, निशा पुरी, विद्या पोळ, बिजली काळेबाग, स्वरा खराटे, रेणुका पदेकर यांची उपस्थिती होती.