रामनगर येथे मोफत किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST2021-05-11T04:31:38+5:302021-05-11T04:31:38+5:30

नियमांचे पालन करा जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी ...

Distribution of free kits at Ramnagar | रामनगर येथे मोफत किटचे वाटप

रामनगर येथे मोफत किटचे वाटप

नियमांचे पालन करा

जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संत शिरोमणी महाराज जयंती साजरी

बदनापूर : तालुक्यातील बावणे पांगरी येथे नाभिक सेवा संघाच्या वतीने संत सेनाजी महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वरपे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गंधारी येथे १५२ नागरिकांचे लसीकरण

शहागड : अंबड तालुक्यातील गोरी-गंधारी ग्रामपंचायत कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने टोचण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी १५२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी समर्थ कारखान्याचे संचालक डी.ए. जाधव, ॲड. नारायण खराद, संदीप तिळवणे, भागवत खराद, तुकाराम मुळीक आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of free kits at Ramnagar