कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:07+5:302021-09-07T04:36:07+5:30
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पंधरा वर्षांपासून ...

कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पंधरा वर्षांपासून कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने हजारो विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे.
परतूर, आष्टी, वाटूर, मंठा येथील अनाथ, अपंग, विधवा महिलांची मुले, कोविड काळात आई-वडील गमावलेली अनाथ मुले, परित्यक्ता महिलांचे पाल्य, आर्थिक दुर्बल घटकातील पाल्य अशा २०१ विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष श्याम वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये आष्टी परिसरातील ३८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी कर्तव्य फाऊंडेशनचे देविदास कऱ्हाळे, सचिन चव्हाण, संतोष खंडागळे, आष्टी पोलीस ठाण्याचे सपोनि. शिवाजी नागवे, मधुकर खरात, सरपंच भागवत कडपे, मनोजकुमार गायकवाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा टेकाळे, हबीब शेख, उमेश कुमावत, प्रल्हाद वाहुळे, सोमेश्वर सोनटक्के, मनोज काटे, कोंडिबा बरसाले, भानुदास टिप्परकर, अविनाश जगताप, राम राठोड आदींची उपस्थिती होती.
फोटो
परतूर तालुक्यातील आष्टी येथे कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.