जि. प. शाळा सिसीटीव्हीच्या निगराणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:21 IST2021-01-01T04:21:11+5:302021-01-01T04:21:11+5:30
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी जिल्हा परिषद शाळेतील वारंवार होणारे नुकसान व शालेय परिसरात होणारी अस्वच्छता टाळण्यासाठी शाळेत सीसीटिव्ही ...

जि. प. शाळा सिसीटीव्हीच्या निगराणीत
रांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी जिल्हा परिषद शाळेतील वारंवार होणारे नुकसान व शालेय परिसरात होणारी अस्वच्छता टाळण्यासाठी शाळेत सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. मुख्याध्यापक गोविंत बागल व रमेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी स्वखचार्तून हा कॅमेरा बसविला आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळेत मुद्दामहून काही लोक अस्वच्छता करीत होते. शिवाय वर्ग खोलीचे कुलूप तोडणे, डेस्कवर घाण करणे, आदीसह जुगार खेळणे हे प्रकार शाळेय परिसरात वाढत चालले होते. याला शिक्षक त्रस्त झाले होते. यावर उपाय म्हणून शिक्षकांनी सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतला होता. याचा परिणाम लगेच दिसून आला. या कॅमे-यामुळे कर्मचाºयांवर लक्ष ठेवणेही आता सोपे झाले आहे. शिवाय अध्यापणास याचा फायदाच होणार असल्याचे मुख्याध्यापक गोविंद बागल यांनी सांगितले. याबद्दल शिक्षकांचे गाव परिसरातून स्वागत होत आहे.