शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

निधी वाटपावरून धुसपूस ; अजित पवारांनी दूर केली गोरंट्याल यांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 15:07 IST

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जालन्यासह राज्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगर पालिकांना विकास निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.

ठळक मुद्दे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि नगर विकास खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा केली. तसेच पवार यांनी सोमवारी आ. गोरंट्याल यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली.

जालना : निधीच्या मुद्यावरून काँग्रेसचे ११ आमदार नाराज असून, या नाराजीचा केव्हाही विस्फोट होऊ शकतो, असा सूचना वजा इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला होता. हे वृत्त राज्यभर झळकताच त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आ. गोरंट्याल यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व जालन्यासह अन्य पालिकांना निधीचे वितरण केले जाईल, असे आश्वासन दिले.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जालन्यासह राज्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगर पालिकांना विकास निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आ.  गोरंट्याल यांनी दोन दिवसांपूर्वी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली होती.  आ. गोरंट्याल यांनी घेतलेल्या भूमिकेचे वृत्त राज्यभर पसरल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि नगर विकास खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा केली. तसेच पवार यांनी सोमवारी आ. गोरंट्याल यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली. काँग्रेस आमदारांच्या मागणीनुसार निधीचे पत्र मंगळवारी आपल्या कार्यालयात येऊन घेऊन जावे, असे आश्वासनही पवार यांनी दिल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.

काय होती नाराजी

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जालन्यासह राज्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगर पालिकांना विकास निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच साधारणपणे २७ मार्च २०२० रोजी २८ कोटी रूपयांचा निधी जालना नगर पालिकेला मंजूर असल्याचा अध्यादेश निघाला होता. मात्र, २९ मार्च रोजी तो अध्यादेश रद्द करून मंजूर परस्पर निधी इतरत्र वळविण्यात आल्याचा आरोप आ. कैलास गोरंट्याल यांनी दोन दिवसांपूर्वी जालना येथे आयोजित  पत्रकार परिषदेत केला होता. तसेच नगर विकास खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याची बाब काँग्रेसच्या नेते मंडळींसह मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, मागणीनुसार निधी मंजूर न झाल्यास काँग्रेसच्या ११ आमदारांमध्ये असलेल्या नाराजीचा विस्फोट केव्हाही होऊ शकतो. आपण वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे आ. गोरंट्याल म्हणाले होते. आ. गोरंट्याल यांनी काँग्रेस आमदारांमध्ये असलेली नाराजी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरंट्याल यांच्यासह इतर आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :fundsनिधीAjit Pawarअजित पवारcongressकाँग्रेस