शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या बांधावरून वाद; भावकीच्या हल्ल्यात पित्याचे संरक्षण करताना मुलाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:02 IST

शेतातील सामाईक बांधावर पावसाचे पाणी वाहण्यासाठी चारी खोदली अन् वादाची ठिणगी पडली

- अझहर शेख वाढोणा ( जि. जालना): वाढोणा शिवारातील गट क्रमांक 119 मधील शेतजमिनीच्या बांधावरून निर्माण झालेल्या वादातून एका 24 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजता घडली. भावकीच्या हल्ल्यात मुलाने वडिलांचे संरक्षण केले पण स्वतःचा जीव गमावल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

तक्रारदार गणेश तुळशीदास तनपुरे (वय 60) हे आपल्या शेतात मुलगा किरण तनपुरे याच्यासोबत काम करत असताना, चुलत भाऊ परमेश्वर गुलाबराव तनपुरे व त्याचा मुलगा किशोर परमेश्वर तनपुरे यांनी शेतातील सामाईक बांधावर पावसाचे पाणी वाहण्यासाठी चारी खोदली. यावरून वाद निर्माण झाला.

गणेश तनपुरे यांनी याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी शिवीगाळ करत त्यांच्या मारहाणीचा प्रकार केला. त्यावेळी किरण तनपुरे यांनी मध्यस्थी करत वडिलांचे संरक्षण केले. मात्र, याच क्षणी आरोपींनी दगडाने त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार हल्ला करत त्याला जागीच ठार मारले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेची नोंद परतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा म्हणून करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तत्पूर्वी दोन तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक मच्छींद्र सुरवसे, उपनिरीक्षक अमोल रावते, विठ्ठल केंद्रे, भिमराव मुंढे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र