मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:20+5:302021-09-06T04:34:20+5:30
जालना : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन डीसीपीएस ...

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
जालना : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन डीसीपीएस तसेच एनपीएससंदर्भात सविस्तर चर्चा केली.
यात सर्व डीसीपीएस धारकांना जळगाव जिल्ह्याच्या धर्तीवर ऑनलाइन हिशोब उपलब्ध करून देण्यात यावा. आंतरजिल्हा बदली करून आलेले व बदली करून बाहेरील जिल्ह्यात गेलेल्या शिक्षकांच्या खात्यावर डीसीपीएस वर्ग करण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर, अप्पासाहेब मुळे, संदीप उबाळे, खराट, संभाजी उस्तुर्गे, विष्णू बिरादार आदींची उपस्थिती होती.
जि.प. शाळेत जयंती साजरी
जालना : तालुक्यातील देवमुर्ती येथील जिल्हा परिषद शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक पी. आर. काळे, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे जिल्हा सचिव परमेश्वर साळवे, गणेश चव्हाण, भीमराव भालेराव, अशोक चावरे, गौतम गवई, नफिसा शेख आदींची उपस्थिती होती.
आंबा येथे ग्राहकांना धनादेश वाटप
आंबा : परतूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने ग्राहकांना केअर हेल्थ इन्शुरन्सच्या ७० जणांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राहुल पाटील, विभागीय व्यवस्थापक सोनाली पाटील, जिल्हा विभागीय व्यवस्थापक प्रदीप काळदाते, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक मिलिंद पगार, कर्मचारी फैजल शेख, रूपेश बोंडे, रामदास श्रीगडे आदींची उपस्थिती होती.