दानवे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर आल्याने खोतकरांच्या माघारीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 14:41 IST2019-03-02T14:36:47+5:302019-03-02T14:41:29+5:30
या एकत्र येण्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

दानवे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर आल्याने खोतकरांच्या माघारीची चर्चा
जालना : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे आज एका आरोग्य तपासणी शिबीरात एकाच व्यासपीठावर आले आहेत. त्यांच्या या एकत्र येण्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
गेल्या वर्षभरापासून अर्जुन खोतकर आणि खा. दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकमेकांवर टिकेची झोड उठवली होती. यामुळे आज खोतकर आणि दानवे यांच्या एकत्र येण्याने अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत. आठवडाभरापुर्वी शिवसेना- भाजप युती जाहीर झाल्यावरही खोतकर यांनी आपण लोकसभेचे मैदान सोडले नसल्याचे जाहीर केले होते. यानंतर आज दानवे यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावल्याने खोतकर यांनी लोकसभेचे मैदान सोडले का ? अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.